सांगली-मिरजेत वेगाला बसणार आळा
By admin | Published: October 16, 2015 11:02 PM2015-10-16T23:02:30+5:302015-10-16T23:12:03+5:30
वेग मर्यादेचे पाच पॉर्इंट : ‘स्पीड गन’ बसविणार; पोलीस प्रमुखांचा बैठकीत निर्णय
सांगली : सांगली, मिरजेत भरधाव वाहनांच्या वेगाला आळा बसविण्याचा निर्णय शुक्रवारी दुपारी प्रवासी समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. अपघात होणारे वेगमर्यादेचे महापालिका क्षेत्रात पाच पॉर्इंट असल्याचे समितीने शोधून काढले आहे. या पॉर्इंटवर ‘स्पीड गन’ बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची कार्यवाही येत्या पंधरा दिवसात सुरु केली जाणार आहे.
अवैध प्रवासी वाहतूक, वाढते अपघात, रिक्षा व प्रवासी वाहतूक वाहनांना थांबे देणे या विषयांवर समितीची आरटीओ कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत आरटीओ दशरथ वाघुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. चव्हाण, उपकार्यकारी अभियंता ए. ए. सावेकर, एसटीच्या सांगली आगाराचे विभाग नियंत्रक एस. ए. वाघाटे, आरटीओ निरीक्षक सचिन विधाते, आर. डी. पाटील, संजय कांबळे, ए. एन. देसाई, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी विजय बक्षी, रामवीर सागवान उपस्थित होते.
पुष्पराज चौक ते मिरजेतील गांधी चौक, पुष्पराज चौक ते काळी खण, आपटा पोलीस चौकी, कॉलेज कॉर्नर, बायपास रोड ते टोलनाका, मिरजेतील बालाजी मंगल कार्यालय ते सिव्हिल चौक, शास्त्री चौक, बसस्थानक व कुपवाड येथील सूतगिरणी ते एमआयडीसी हे पाच पॉर्इंट वेगमर्यादेचे निश्चित केले आहेत. या मार्गावरील रस्त्यांची स्थिती, वाहतुकीचे प्रमाण याची समितीने पाहणी केली आहे. येत्या पंधरा दिवसात अधिसूचना काढली जाणार आहे. त्यानंतर वेगमर्यादा किती असावी? याचे फलक लावले जातील. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी स्पीड गन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
एसटी चालक रडारवर : फुलारी
पोलीसप्रमुख फुलारी म्हणाले, एसटी चालक रस्त्यावरच एसटी उभी करतात. यातून वाहतुकीस अडथळा तसेच अपघातही होत आहेत. त्यामुळे चालकांसाठी कार्यशाळा आयोजित करुन त्यांना वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन केले जाईल. यातूनही त्यांच्यात सुधारणा न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल व लायसन्स निलंबित केले जाईल.
वडाप वाहने : पंधरा थांबे निश्चित
शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या-पिवळ्या वाहनांना नव्याने १५ थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सांगलीत रेल्वे स्टेशन, अहिल्यादेवी होळकर चौक, मुख्य बस स्थानक, झुलेलाल चौक, सिव्हिल हॉस्पिटल, कर्नाळ पोलीस चौकी, कॉलेज कॉर्नर, वसंतदादा साखर कारखाना, मिरजेत रेल्वे स्टेशन, मुख्य बस स्थानक, मिशन हॉस्पिटल, जवाहर चौक, कृष्णा घाट रोड, जकात नाक्याजवळ, कुपवाड बसथांबा या थांब्यांचा समावेश आहे.
‘वडाप’चे सहाशे परवाने निलंबित : वाघुले
आरटीओ वाघुले म्हणाले, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहाशेहून अधिक वाहनांचे परवाने निलंबित केले आहेत. पोलीस आणि आरटीओ यांच्या स्वतंत्र पथकाने ही कारवाई केली आहे. ही कारवाई सुरुच आहे.
सांगली : सांगली, मिरजेत भरधाव वाहनांच्या वेगाला आळा बसविण्याचा निर्णय शुक्रवारी दुपारी प्रवासी समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. अपघात होणारे वेगमर्यादेचे महापालिका क्षेत्रात पाच पॉर्इंट असल्याचे समितीने शोधून काढले आहे. या पॉर्इंटवर ‘स्पीड गन’ बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची कार्यवाही येत्या पंधरा दिवसात सुरु केली जाणार आहे.
अवैध प्रवासी वाहतूक, वाढते अपघात, रिक्षा व प्रवासी वाहतूक वाहनांना थांबे देणे या विषयांवर समितीची आरटीओ कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत आरटीओ दशरथ वाघुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. चव्हाण, उपकार्यकारी अभियंता ए. ए. सावेकर, एसटीच्या सांगली आगाराचे विभाग नियंत्रक एस. ए. वाघाटे, आरटीओ निरीक्षक सचिन विधाते, आर. डी. पाटील, संजय कांबळे, ए. एन. देसाई, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी विजय बक्षी, रामवीर सागवान उपस्थित होते.
पुष्पराज चौक ते मिरजेतील गांधी चौक, पुष्पराज चौक ते काळी खण, आपटा पोलीस चौकी, कॉलेज कॉर्नर, बायपास रोड ते टोलनाका, मिरजेतील बालाजी मंगल कार्यालय ते सिव्हिल चौक, शास्त्री चौक, बसस्थानक व कुपवाड येथील सूतगिरणी ते एमआयडीसी हे पाच पॉर्इंट वेगमर्यादेचे निश्चित केले आहेत. या मार्गावरील रस्त्यांची स्थिती, वाहतुकीचे प्रमाण याची समितीने पाहणी केली आहे. येत्या पंधरा दिवसात अधिसूचना काढली जाणार आहे. त्यानंतर वेगमर्यादा किती असावी? याचे फलक लावले जातील.
वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी स्पीड गन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)