क-हाड-पंढरपूर रेल्वेमार्गाची पंतप्रधानांकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 04:05 PM2020-01-31T16:05:34+5:302020-01-31T16:05:40+5:30
आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम व तत्कालीन केंदीय मंत्री प्रतीक पाटील यांनी कºहाड-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालयाने कºहाड-पंढरपूर मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती; परंतु अद्याप या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झालेले नाही. पुढील कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.
कडेगाव : गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कºहाड-कडेगाव-पंढरपूर या रेल्वेमार्गासाठी सोनसळ (ता. कडेगाव) येथील तरुण सामाजिक कार्यकर्ता विश्राम कदम याने थेट पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर पत्राद्वारे आॅनलाईन पाठपुरावा केला. याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाचे सचिव अंबुज शर्मा यांनी याबाबत पुढील कार्यवाहीसाठी उपसचिव जे. जे. वाळवी यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
क-हाड-पंढरपूर या १४५ कि.मी.च्या रेल्वेमार्गाची मागणी दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. हा रेल्वेमार्ग झाला तर कडेगावसह दुष्काळी पट्ट्यातील तालुक्याच्या विकासाला चालना तर मिळेलच, शिवाय द्राक्ष, डाळिंब आदी शेतीमाल कोकणसह पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठविण्याची चांगली व्यवस्था होणार आहे. याशिवाय पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने कोकण, क-हाड, कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यांतील वारक-यांना पंढरपूरला जाण्यास रेल्वेची सोय होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे छोटे-मोठे व्यवसाय वाढून नव्या बाजारपेठा विकसित होण्यास मदत होणार आहे. आर्थिक उलाढाल, रोजगार वाढीलाही चालना मिळणार आहे. साहजिकच दुष्काळी पट्ट्यात विकासाला मदत होऊ शकते, असे विश्राम कदम याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसे पत्र विश्राम याने रेल्वे मंत्रालयालाही दिले आहे.
आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम व तत्कालीन केंदीय मंत्री प्रतीक पाटील यांनी क-हाड-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालयाने कºहाड-पंढरपूर मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती; परंतु अद्याप या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झालेले नाही. पुढील कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.