जागतिक कवी दिनाला काळ्या खणीवर बरसल्या काव्यसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:23 AM2021-03-22T04:23:49+5:302021-03-22T04:23:49+5:30
जागतिक कवी दिनानिमित्त काळी खण येथे रविवारी सकाळी रंगलेल्या कविसंमेलनात दयासागर बन्ने, गौतम कांबळे, प्रा. संजय ठिगळे, अश्विनी कुलकर्णी, ...
जागतिक कवी दिनानिमित्त काळी खण येथे रविवारी सकाळी रंगलेल्या कविसंमेलनात दयासागर बन्ने, गौतम कांबळे, प्रा. संजय ठिगळे, अश्विनी कुलकर्णी, अस्मिता इनामदार आदी सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जागतिक कवी दिनानिमित्त काळ्या खणीवर भल्या सकाळी काव्यसरी बरसल्या. ‘शहराला हवी ओळख नवी’ या संकल्पनेंतर्गत सांगली-मिरजेतील कवींनी कविता सादर केल्या.
आपल्या शहराचा इतिहास, भाषा, संस्कृती, ओळख जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे या भावनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. इतिहास संशोधक मानसिंग कुमठेकर यांनी सांगली शहराचा इतिहास उलगडला. यानंतर झालेल्या कविसंमेलनात दयासागर बन्ने, गौतम कांबळे, नाईकबा गिड्डे, अश्विनी कुलकर्णी, अस्मिता इनामदार, वैभव चौगुले, वर्षा चौगुले, वंदना हुलबत्ते, मुबारक उमराणी, सुहास पंडित, तानाजी जाधव यांनी कविता सादर केल्या. यावेळी उपस्थित नगरसेवक अमर निंबाळकर यांनी काळी खण विकास आराखडा मंजूर करून सांगलीकरांसाठी विरंगुळा केंद्र लवकरच प्रत्यक्षात साकार होईल, असे सांगितले.
स्वागत समाधान पोरे यांनी केले. संयोजन संजय ठिगळे, मुस्तफा मुजावर, अभिजित पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विशाल कुलकर्णी यांनी केले.