मॉडीफाय दुचाकींवर पोलिसांची कारवाई सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:20 AM2020-12-27T04:20:18+5:302020-12-27T04:20:18+5:30
दुचाकीस्वारांकडून वाहनाच्या सायलेंसरमध्ये बदल करून मोठा आवाजात गाड्या फिरविल्या जात आहेत. शुक्रवारी सांगलीवाडी येथील एकाने वाढदिवसानिमित्त आवाजाच्या स्पर्धा भरविल्या ...
दुचाकीस्वारांकडून वाहनाच्या सायलेंसरमध्ये बदल करून मोठा आवाजात गाड्या फिरविल्या जात आहेत. शुक्रवारी सांगलीवाडी येथील एकाने वाढदिवसानिमित्त आवाजाच्या स्पर्धा भरविल्या होत्या. त्यात ३७ दुचाकींवर कारवाई करण्यात आली हाेती, तर ७१ जण कारवाई दरम्यान पळून गेले होते. शनिवारी वाहतूक शाखेने शहरातील प्रमुख मार्गावर पुन्हा मोहीम उघडत कारवाई केली. यात आठ बुलेटसह इतर वाहनांचा समावेश आहे. सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व आरटीओच्या परवानगीशिवाय वाहनांमध्ये कोणताही बदल करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
चौकट -
शहर पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईतील वाहनचालकांना बोलावून त्यांना समज देत कारवाई केली. कारवाईत जप्त केलेल्या वाहनचालक तरुण व त्यांच्या पालकांनाही पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते.