Sangli: कुत्रे आडवे आले; दुचाकी अपघातात पुण्यातील पोलीस हवालदार ठार, एक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:10 IST2025-02-11T18:10:07+5:302025-02-11T18:10:29+5:30

सदानंद औंधे मिरज : मिरजेत सांगली रस्त्यावर मोकाट कुत्रे आडवे आल्याने अपघातात पोलीस हवालदार सम्राट काकासो कदम (वय ४०, ...

Police constable killed in accident after dogs came across him on Sangli road in Miraj | Sangli: कुत्रे आडवे आले; दुचाकी अपघातात पुण्यातील पोलीस हवालदार ठार, एक जखमी 

Sangli: कुत्रे आडवे आले; दुचाकी अपघातात पुण्यातील पोलीस हवालदार ठार, एक जखमी 

सदानंद औंधे

मिरज : मिरजेतसांगली रस्त्यावर मोकाट कुत्रे आडवे आल्याने अपघातात पोलीस हवालदार सम्राट काकासो कदम (वय ४०, रा सुभाषनगर मिरज) हे ठार झाले. तर, दुचाकी चालक प्रकाश तातोबा संपकाळ हे जखमी झाले. 

पुण्यातील बालाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सम्राट कदम हे त्यांच्या मेव्हणा प्रकाश संकपाळ यांच्या (एम एच १० बी.एफ ४५७७) दुचाकीवरून सोमवारी रात्री नऊ वाजता सांगलीकडे जात होते. यावेळी मिरजेतील सिद्धी विनायक हॉस्पिटल समोर अचानक मोकाट कुत्रे आडवे आल्याने दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पलीकडे पडले. यावेळी समोरून वेगात आलेल्या मोटारीने त्यांच्या डोक्याला ठोकरल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. जखमी दुचाकी चालक प्रकाश संपकाळ यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असून मोकाट कुत्र्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. सोमवारी झालेल्या अपघातात पोलीस हवालदार सम्राट कदम यांचा नाहक बळी गेला. सम्राट कदम यांनी वीस वर्षे पोलिस दलात सेवा केली होती. कदम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. पोलीसांनी दुचाकीचालक प्रकाश संपकाळ रा. कवठेपीरान ता मिरज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गांधी चौक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Police constable killed in accident after dogs came across him on Sangli road in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.