उपनिरीक्षक कामटेसह पाच जणांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 04:06 AM2017-11-10T04:06:28+5:302017-11-10T04:06:39+5:30
पोलीस कोठडीतील आरोपी अनिकेत अशोक कोथळे याच्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच जणांना गुरुवारी न्यायालयाने १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सांगली : पोलीस कोठडीतील आरोपी अनिकेत अशोक कोथळे याच्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच जणांना गुरुवारी न्यायालयाने १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सांगली येथे एका अभियंत्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून दोन हजार रुपये आणि मोबाइल पळविल्याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित म्हणून अनिकेत कोथळे आणि अमोल सुनील भंडारे या दोघांना अटक केली होती. सोमवारी रात्री पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत कोथळेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला. या धक्कादायक प्रकाराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही दखल घेतली आहे. या प्रकरणी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना नोटीस देऊन चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे.