सांगली जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांची मोहिम; ६४ जण ताब्यात, सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 02:34 PM2022-07-21T14:34:25+5:302022-07-21T14:34:50+5:30
सांगली : जिल्ह्यातील अवैध धंदे, जुगार, मटका, गावठी दारू याविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहिम उघडली आहे. गेल्या दोन दिवसांत अवैध ...
सांगली : जिल्ह्यातील अवैध धंदे, जुगार, मटका, गावठी दारू याविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहिम उघडली आहे. गेल्या दोन दिवसांत अवैध दारूप्रकरणी २७ तर जुगार खेळणाऱ्या ३७ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस अधिक्षक दीक्षीत गेडाम यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाी करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह सर्वच पोलिस ठाण्यांना दिले होते. विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दारूचा अवैध साठा केल्याप्रकरणी २७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून एक हजारहून अधिक बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच गावठीदारूचे रसायन, लाकूड, पावडर असा ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जुगार खेळणाऱ्याविरोधातही पोलिसांनी कडक कारवाई केली. जिल्ह्यातील ३७ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एका रिक्षासह दोन लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर ४५९ जणांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई अधिक्षक गेडाम, अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधिक्षक अजय टिके, अशोक वीरकर, कृष्णात पिंगळे, रत्नाकर नवले, अश्विनी शेंडगे, पद्मा कदम, सुरेखा दुग्गे, एलसीबीचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकाने केली.