कर्ज मंजुरीचा बहाणा, मुंबई क्राईम ब्रॅंचच्या पोलिसाने सांगलीतील एकास घातला गंडा
By संतोष भिसे | Published: February 14, 2024 06:03 PM2024-02-14T18:03:44+5:302024-02-14T18:04:59+5:30
सांगली : मुंबई पोलिस दलात क्राईम ब्रॅंचमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगलीतील एकाची ४० हजारांची फसवणूक केली. याबाबत मोहनदास हणमंत ...
सांगली : मुंबईपोलिस दलात क्राईम ब्रॅंचमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगलीतील एकाची ४० हजारांची फसवणूक केली. याबाबत मोहनदास हणमंत जोगदंड (रा. हसनी आश्रम नजीक, श्रीरामनगर, वालनेसवाडी, सांगली ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार विक्रांत कसरनाथी रावळ (वय ४०, रा. बी विंग, हप्पी स्मृती, साईनगर, नवघर, वसई वेस्ट ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित विक्रांत रावळ याने जोगदंड यांना ८० लाख रुपये कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी जोगदंड यांच्याकडून वेळोवेळी ८० हजार रुपये घेतले. परंतु कर्ज मंजूर केले नाही. त्यामुळे जोगदंड यांनी पैसे परत मिळावेत यासाठी पाठपुरावा सुरु केला. त्यामुळे रावळ याने ४० हजार रुपये परत केले. उर्वरित पैशांसाठी बऱ्याच पाठपुराव्यानंतरही ते मिळाले नाहीत, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे जोगदंड यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.