बावची फाट्यानाजिकचा बाजार पोलिसांनी हटवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:47+5:302021-05-20T04:28:47+5:30
इस्लामपूर-आष्टा रस्त्यावर बावची फाट्यानजिक भाजीपाला विक्रेत्यांना आष्टा पोलिसांनी धुडकावून लावले. लोकमत न्यूज नेटवर्क गोटखिंडी : इस्लामपूर-आष्टा रस्त्यावरील बावची फाट्यानजिक ...
इस्लामपूर-आष्टा रस्त्यावर बावची फाट्यानजिक भाजीपाला विक्रेत्यांना आष्टा पोलिसांनी धुडकावून लावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोटखिंडी : इस्लामपूर-आष्टा रस्त्यावरील बावची फाट्यानजिक भाजी विक्रेते भाजीपाला विक्री करत असल्याने गर्दी झालेली होती. त्याची माहिती समजताच आष्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुतार व त्यांचे टीमने रस्त्याकडेलाच चाललेला बाजार उठवला. बावची, गोटखिंडी येथे दोन दिवसांत विनाकामाचे व बिगरमास्क अशा २९ जणांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून १४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. कलम १८८ प्रमाणे तीन दुकानदारांवर कारवाई करत एक हजार १०० दंड आकारण्यात आला.
बावची येथे मंगळवारी भाजी विक्रेते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. भाजी विक्रेते यांनी बावची येथील थाटलेली दुकाने बंद करून इस्लामपूर - आष्टा रस्त्यावर बावची फाट्यावर भाजी विक्रेत्यांचा बाजार मांडलेला होता. तेथे गर्दी होत असल्याने आष्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुतार व त्यांचे सहकारी राजकुमार जंगम, महेश डांगे, योगेश जाधव, यशवंत कोळी यांनी बाजार हटवला, तर बिनकामाचे, बिगरमास्क मोटरसायकलवरून फिरणाऱ्या २९ जणांवर कारवाई करत मोटरसायकली पोलीस ठाण्यात नेण्यात आल्या. यावेळी पोलीस हवालदार अशोक जाधव, एस. एस. सनदी यांनी कारवाई केली.