पोलिसांकडून ६५ बाटल्या दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:07+5:302021-09-07T04:33:07+5:30
सांगली : अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली असून, रविवारी जिल्ह्यातील कुंडल, पलूस आणि जत पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ...
सांगली : अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली असून, रविवारी जिल्ह्यातील कुंडल, पलूस आणि जत पाेलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. यात तिघांना अटक करत त्यांच्याकडून देशी दारूच्या ६५ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
-----------
श्रावणी सोमवारमुळे मंदिरात गर्दी
सांगली : कोरोना संसर्गामुळे मंदिरे बंद असली तरी शहरासह परिसरातील अनेक मंदिरांत सोमवारी भाविकांनी गर्दी केली होती. शेवटचा सोमवार असल्याने अनेकांनी मंदिर परिसरात हजेरी लावून दर्शन घेणे पसंत केले. यात्रा, जत्रांवर बंदी असल्याने भाविकांनी मंदिराच्या बंद दरवाजातूनच दर्शन घेऊन श्रावणाची सांगता केली.
-----
पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव
सांगली : शहरातील चारही पोलीस ठाण्यांत अनेक वर्षांपासून बेवारसपणे पडून असलेल्या वाहनांचा अखेर आता लिलाव हाेणार आहे. पोलीस प्रशासनाने याबाबतची माहिती संकेतस्थळावर दिली असून, निर्धारित वेळेत मूळ मालकांनी वाहन न नेल्यास या वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरातील अस्ताव्यस्तपणा कमी होणार आहे.
--------