तळीरामांच्या वाहनांचा पोलीस लिलाव करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:27 AM2021-04-16T04:27:34+5:302021-04-16T04:27:34+5:30
मिरज वाहतूक नियत्रंण शाखेने २०१६ ते २०१९ या कालावधीत मद्यपान करून वाहन चालविल्याबद्दल शेकडो खटले दाखल केले आहेत. ...
मिरज वाहतूक नियत्रंण शाखेने २०१६ ते २०१९ या कालावधीत मद्यपान करून वाहन चालविल्याबद्दल शेकडो खटले दाखल केले आहेत. मात्र पोलिसांनी पकडल्यानंतर अनेक तळीरामांनी त्यांचे नाव व पत्ते चुकीचे सांगितले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही वाहनांचे क्रमांकही चुकीचे आहेत. यामुळे या दुचाकी वाहनांचे मूळ मालक सापडलेले नाहीत. ज्यांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत अशा नागरिकांनी चोरीस गेलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांसह संपर्क साधावा व ज्या वाहनचालकांविरुद्ध मद्यपान करुन वाहन चालविल्याबद्दल खटला दाखल आहे अशा वाहन चालकांनी मिरज वाहतूक नियंत्रण शाखेकडे संपर्क साधून दुचाकी वाहने ताब्यात घ्यावीत. अन्यथा ताब्यात असलेल्या या दुचाकींचा १० दिवसात जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. लिलावानंतर आलेल्या वाहन मालकांची कोणतीही तक्रार ऐकून घेण्यात येणार नसल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले.