पाणीपट्टीचे राज्याचे धोरण एक हवे

By admin | Published: February 17, 2016 01:22 AM2016-02-17T01:22:55+5:302016-02-17T01:22:55+5:30

शरद पवार : अंजनीत आर. आर. पाटील यांना मान्यवरांकडून आदरांजली

The policy of the water tank is one | पाणीपट्टीचे राज्याचे धोरण एक हवे

पाणीपट्टीचे राज्याचे धोरण एक हवे

Next


तासगाव : पाणी योजनांची पाणीपट्टी भरायला हवी. मात्र, राज्यातील सर्व पाणी योजनांची पाणीपट्टी एकसारखी असायला हवी. तसे धोरण निश्चित करायला हवे. तसे केल्यास शेतकऱ्यांना ‘म्हैसाळ’ची पाणीपट्टी भरा म्हणून सांगण्याची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. आर. आर. आबांवर विश्वास टाकणाऱ्या येथील जनतेचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही. मात्र, कार्यकर्त्यांनीही एकसंधपणा कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अंजनी (ता. तासगाव) येथे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, माजी खासदार निवेदिता माने, स्मिता पाटील यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, येथील भाग दुष्काळी असला तरी, यशवंतराव चव्हाण, वि. स. पागे, आर. आर. पाटील यांच्यासारखे नेते या भागाने तयार केले. त्यांनी केवळ मतदारसंघापुरताच नव्हे, तर सबंध महाराष्ट्राचा विचार केला. आबा गेल्यानंतर सुमनतार्इंवर जबाबदारी सोपवली. कार्यकर्त्यांची एकजूट टिकली पाहिजे. मात्र या एकजुटीला दृष्ट लागत असल्याचे दिसत आहे. कार्यकर्ता अस्वस्थ आहे. काही लोकांनी तासगावात नको ते उद्योग सुरू केले असले तरी, त्यांनी (पान ७ वर)

Web Title: The policy of the water tank is one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.