मिरजेत राजकीय जुगलबंदी : भाजप महापौरांना हवा जयतरावांचा आशिर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 06:16 PM2020-10-26T18:16:53+5:302020-10-26T18:18:48+5:30

elecation, muncipalty, ncp, jayantpatil, bjp, sanglinews सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचा आशिर्वाद मागितला. मिरजेतील जाहिर कार्यक्रमात जयंत पाटील यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवा. जनतेसाठी खूप कामे करेन असे वक्तव्य केले.

Political juggling in Miraj: BJP mayors want Jayatarao's blessings | मिरजेत राजकीय जुगलबंदी : भाजप महापौरांना हवा जयतरावांचा आशिर्वाद

मिरजेत राजकीय जुगलबंदी : भाजप महापौरांना हवा जयतरावांचा आशिर्वाद

googlenewsNext
ठळक मुद्देभाजप महापौरांना हवा जयतरावांचा आशिर्वाद भाजप नेत्याबद्दलच्या प्रेमाची दिली कबुली

 सांगली : सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचा आशिर्वाद मागितला. मिरजेतील जाहिर कार्यक्रमात जयंत पाटील यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवा. जनतेसाठी खूप कामे करेन असे वक्तव्य केले. त्यावर भाजपच्या दोन नेत्यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे.
त्यांच्या आदेशानेच महापौर असे बोलल्या असतील. पण मी महापालिकेत आल्याचे तुम्हाला आवडेल की नाही हे माहित नसल्याने महापालिकेत येत नसल्याची अशी कोपरखळी जयंतरांवांनी भाजपला मारली.

मिरजेतील प्रभाग २० मध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात महापौर सुतार यांनी जयंत पाटील यांना महापालिकेच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक घेण्याचे निमंत्रण दिले. त्या म्हणाल्या, मी पक्ष बघत नाही. साहेब, तुम्ही डोक्यावर हात ठेवा. जनतेची खूप कामे करेन. त्याला जयंतरावांनी प्रतिसाद देत भाजपचे नेते शेखर इनामदार व मकरंद देशपांडे यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. त्यांच्या सांगण्यावरुनच महापौर बोलल्या असतील.

मी उद्या महापालिकेत येऊन बसतो. पण ते तुम्हाला आवडेल की नाही, हे माहित नाही. आता महापौरांनीच निंमत्रण दिले आहे तर पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. २००८मध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची सत्ता आली होती. या सत्तेत भाजपही सहभागी होता.

शेखर इनामदार यांना उपमहापौर तर मकरंद देशपांडे यांना स्थायी सभापतीची संधी जयंतरावांनी दिली होती. हजार मतांनी निवडून आले तर नगरसेवक योगेंद्र थोरात हे सात मतांनी निवडून आले. दोन वर्षात त्यांनी सात कोटीची कामे केली. ते हजार मतांनी निवडून आले तर वार्डात हजार कोटीची जामे होतील असे कौतुकही जयंत पाटील यांनी थोरात यांचे केले.

Web Title: Political juggling in Miraj: BJP mayors want Jayatarao's blessings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.