आष्टा शहरात विकासाचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:20 AM2020-12-07T04:20:10+5:302020-12-07T04:20:10+5:30
आष्टा : आष्टा नगरीचे शिल्पकार माजी आमदार विलासराव शिंदे यांनी आष्टा शहराच्या विकासाला प्राधान्य दिले. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरूनच ...
आष्टा : आष्टा नगरीचे शिल्पकार माजी आमदार विलासराव शिंदे यांनी आष्टा शहराच्या विकासाला प्राधान्य दिले. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरूनच शहराचा सर्वांगीण विकास करण्यात येईल. शहरात विकासाचे राजकारण सुरू आहे, असे प्रतिपादन आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी केले.
आष्टा पालिकेचा १६७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे, झुंजारराव पाटील, झिनत आत्तार, दिलीप वग्यानी, विशाल शिंदे, विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, तेजश्री बोंडे यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वैभव शिंदे, झुंजारराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला.
नगराध्यक्षा स्नेहा माळी म्हणाल्या, शहरात माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा डोंगर उभा राहिला आहे. शहरातील घरकुल, रस्ते, गटारी यासह विविध विकासकामे पूर्ण करण्यात येत आहेत.
झुंजारराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वैभव शिंदे, अर्जुन माने, विराज शिंदे ,दिलीप वग्यानी, सतीश माळी, तेजश्री बोंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी आभार आभार मानले. यावेळी डॉ. प्रकाश आडमुठे, प्रकाश रुकडे, वसंत खोत, बाबा सिद्ध, आर. एन. कांबळे, आर. के. दाटीया, संकेत पाटील, संदीप गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
चौकट:
नगरसेवक अर्जुन माने यांना उपनगराध्यक्ष पद देण्याचा शब्द वरिष्ठांनी दिला होता, मात्र तो पाळला गेला नाही. त्यामुळे या कार्यक्रमावेळी अर्जुन माने यांनी, एकदा दिलेला शब्द पाळण्यात यावा अन्यथा तुमच्यासोबत कार्यकर्ते राहणार नाहीत, असे ठणकावून सांगितले.
फोटो-०६आष्टा०१
फोटो ओळ :
आष्टा नगरपरिषदेच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी वैभव शिंदे, विशाल शिंदे, झुंजारराव पाटील, झुंजारराव शिंदे, स्नेहा माळी, तेजश्री बोंडे, प्रकाश रुकडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण उपस्थित होते.