८२ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:27 AM2018-04-24T00:27:32+5:302018-04-24T00:27:32+5:30
सांगली : जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार २७ मे रोजी मतदान होणार असून, जिल्ह्यातील ४० ठिकाणच्या पोटनिवडणुकाही याच कालावधीत पार पडणार आहेत.
शिराळा तालुक्यातील सर्वाधिक २७, आटपाडीतील २०, तर कवठेमहांकाळच्या १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत.यात जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या गावांचा समावेश असून, थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमुळे चुरस वाढणार आहे.
जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधित मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली असून, त्यात जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार असल्याने हवामानाबरोबरच गावचे राजकीय वातावरणही चांगलेच तापणार आहे.
निवडणुका होणारी गावे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे : मिरज- कावजी खोतवाडी, निलजी बामणी, वाजेगाव. कवठेमहांकाळ - बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, अग्रण धुळगाव, घोरपडी, करोली (टी), कोकळे, शिंदेवाडी, ढोलेवाडी, ढालगाव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. जत - गुलगुंजनाळ, कों. बोबलाद, कोणबगी, बिळूर, खिलारवाडी. खानापूर - देवनगर, भेंडवडे, राजधानी भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी - नेलकरंजी, वाकसेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, खांजोडवाडी, आटपाडी, बनपुरी, भिंगेवाडी, करगणी, मापटेमळा, मुढेवाडी, निंबवडे, पूजारवाडी, विभूतवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी. पलूस - आमणापूर, विठ्ठलवाडी. कडेगाव - वाजेगाव, चिंचणी, वांगी. शिराळा - वाकुर्डे बु, भाटशिरगाव, धसवाडी, करूंगली, मादळगाव, खुजगाव, रांजणवाडी, रिळे, शिरशी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंग्रुळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणी, मोरेवाडी, पणुंब्रे तर्फ वारुण, पाचगणी, मानेवाडी.
४० गावांत पोटनिवडणूक
८२ गावांच्या ग्रामपंचायतींबरोबरच ९ गावांतील सरपंच पदांसाठी व ७२ सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकाही होत आहेत. ४० गावांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील ९ सदस्य, २ सरपंच, तासगावमधील ६ सदस्य, जतमधील २४ सदस्य, १ सरपंचपद, आटपाडीतील ३ सदस्य, विट्यातील ८ सदस्य, कडेगावात ४ सदस्य १ सरपंच, पलूसमध्ये ४ सदस्य, १ सरपंच, वाळवा येथे ७ सदस्य, ३ सरपंच, शिराळा येथे ८ सदस्य व एका सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होणार आहे.
नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याची
दिनांक ७ मे ते १२ मे
उमेदवारी अर्जांची
छाननी १४ मे
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची दि. १६ मे
निवडणूक चिन्हांचे वाटप १६ मे
मतदान २७ मे (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)
मतमोजणी २८ मे