ग्रामपंचायत निवडणुकीकरिता सांगली जिल्ह्यात रविवारी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:01 AM2019-06-22T11:01:05+5:302019-06-22T11:04:25+5:30
सांगली जिल्ह्यातील माहे जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ६५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तसेच रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरिता रविवार दिनांक 23 जून 2019 रोजी मतदान व सोमवार दिनांक 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यातील माहे जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ६५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तसेच रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरिता रविवार दिनांक 23 जून 2019 रोजी मतदान व सोमवार दिनांक 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणूका शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करीता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मुंबई दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक 22 जून 2019 ते 24 जून 2019 रोजी मतमोजणी संपेपर्यंंत संबधित क्षेत्रातील सर्व प्रकारच्या मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या (एफएल-2, एफएल-3, फॉर्म ई, ई-2, एफएलडब्ल्यू-2, एफएलबीआर-2, सीएल-3, टिडी-1) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत
या आदेशानुसार मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंदचा कालावधी व कंसात बंदचे कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे. निवडणूक लगतपूर्व व मतदानाचा दिवस शनिवार दिनांक 22 जून 2019 व रविवार दिनांक 23 जून 2019 रोजी पूर्ण दिवस (सांगली जिल्ह्यातील माहे जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 मध्ये मुदती संपणाऱ्या, नव्याने स्थापित व पोटनिवडणुका असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील), तसेच मतमोजणीचा/ मतमोजणीचे दिवस सोमवार दिनांक 24 जून 2019 रोजी मतमोजणी संपेपर्यंत (ज्या ठिकाणी मतमोजणी होईल त्या ठिकाणी) सर्व प्रकारच्या मद्य व ताडी विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरूध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार विटा तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीकरिता असलेल्या ग्रामपंचायती व कंसात रिक्त जागा पुढीलप्रमाणे - डोंगरवाडी (2), सांबरवाडी (3), खरकटवाडी (2), रसुलवाडी (2), शिपूर (1), बामणोली (1), निलजीबामणी (1), कावजी खोतवाडी (1), मालगाव (1), तुंग (1), हरोली (1), कदमवाडी (1), जाधवनगर (2), देवनगर (1), भेडवडे (बु.) (1), धोंडेवाडी (2), ढवळेश्वर (1), रामनगर (2), जोंधळखींडी (1), विसापूर (1), वासुंबे (1), कोणबगी (1), गोटेवाडी (1), कोणीकुर्ण (1), बोर्गी बुद्रक (1), ढाणेवाडी (1), रेणुशेवाडी (2), तुपेवाडी (ये) (1), उपाळेवांगी (1), वाजेगाव (1), नेर्ली (1), पुणदीवाडी (1), पुणदी (वा) (1), तावदरवाडी (1), बुरंगवाडी (1), बेलेवाडी (2), चिखलवाडी (1), चिंचेवाडी (1), खराळे (2), भैरववाडी (1), शिवरवाडी (1), धसवाडी (2), कुसळेवाडी (1), ढोलेवाडी (1), कदमवाडी (2), खुदलापूर (1), वाकाईवाडी (2), चरण (1), पाचगणी (2), मोरेवाडी (2), पावलेवाडी (1), लादेवाडी (1), प. त. वारूण (1), अस्वलेवाडी (2), शिंदेवाडी (2), बिळाशी (2), मराठेवाडी (2), डोंगरवाडी (2), फार्णेवाडी बी (2), भरतवाडी (2), माणिकवाडी (1), फार्णेवाडी शि (1), नायकलवाडी (1), गाताडवाडी (1) व येलूर (1).