डाळिंब उत्पादकांची खुलेआम फसवणूक : आटपाडीतील स्थिती -- डाळिंबावर जीएसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:42 PM2019-02-02T23:42:48+5:302019-02-02T23:44:41+5:30

कोणत्याही वस्तूची आवक बाजारात वाढली की त्या वस्तूची किंमत घटते आणि आवक कमी झाली की वस्तूची किंमत वाढते, हा अर्थशास्त्राचा तेजी-मंदीचा नियम आटपाडीत अडतदार आणि व्यापाºयांनी खोटा ठरविण्याचा पराक्रम केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे डाळिंब उत्पादनात कमालीची घट होऊनही ४० ते ६० प्रतिकिलो रुपयांवर दर गेला

 Pomegranate Growers Openly Cheating: Atpapadi Status - Pomegranate GST | डाळिंब उत्पादकांची खुलेआम फसवणूक : आटपाडीतील स्थिती -- डाळिंबावर जीएसटी

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने आवारात शेतकºयांसाठी असा फलक लावला आहे. पण तक्रार करणाºया शेतकºयांची डाळिंबे पुन्हा कुणीच विकत घेत नसल्याने हा फलक कुचकामी ठरला आहे.

Next
ठळक मुद्देअडत्याकडून डमी व्यापारी उभे करून दर पाडण्याचा उद्योग; शेतकऱ्यांमधून नाराजी-

अविनाश बाड ।
आटपाडी : कोणत्याही वस्तूची आवक बाजारात वाढली की त्या वस्तूची किंमत घटते आणि आवक कमी झाली की वस्तूची किंमत वाढते, हा अर्थशास्त्राचा तेजी-मंदीचा नियम आटपाडीत अडतदार आणि व्यापाºयांनी खोटा ठरविण्याचा पराक्रम केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे डाळिंब उत्पादनात कमालीची घट होऊनही ४० ते ६० प्रतिकिलो रुपयांवर दर गेला नाही. बाजार समितीतील अडतदार डमी व्यापारी उभा करून स्वत:च डाळिंब खरेदी करत असल्याने डाळिंबाचे दर वाढत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

यंदा पावसाने वर्षभर पाठ फिरविल्याने तालुक्यात डाळिंबाचे उत्पादन घटले आहे. अनेक शेतकºयांना डाळिंब बागात डाळिंबाचा एकही बहर धरता आलेला नाही. काही शेतकºयांनी थेंब-थेंब पाण्याचा वापर करून मोठ्या कष्टाने डाळिंबाचे उत्पादन काढले आहे. डाळिंब खरेदी करण्यासाठी संपूर्ण देशातून इथे व्यापारी येतात. या व्यापाºयांना तालुक्यातील शेतकºयांच्या बागा दाखविणारे दलाल त्यांच्या कमिशनसाठी शेतकºयांना लुटत आहेत. हे दलालच दर पाडून व्यापाºयांचा फायदा करून देऊन स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड लिलाव पध्दतीने होणारे डाळिंबाचे सौदे अलीकडे शेतकºयांच्या डोळ्यात धूळफेक करणारे ठरत आहेत. लिलाव उघड करण्याचे फक्त नाटक केले जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.
अनेक अडतदार केवळ डमी व्यापारी सौदा करताना उभा करत आहेत. स्वत:च डाळिंब खरेदी करत असल्याने दर पाडत आहेत. त्यामुळे यावर्षी आवक कमी होऊनही दर अजिबात वाढलेला नाही. चुकून बाहेरचा एखादा व्यापारी आलाच तर, त्यादिवशी एकदम दर वाढवून त्याला त्याचदिवशी तोट्यात आणण्याची शाळा इथले अडतदार करीत आहेत. त्यामुळे जवळच्या सांगोला (जि. सोलापूर) येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात व्यापारी खरेदी करत असताना, आटपाडीत मात्र व्यापारी फिरकताना दिसून येत नाहीत. बाजार समितीला गेल्यावर्षी केवळ डाळिंबातून सुमारे ५० लाख कर मिळाला आहे.
काही व्यापारी पळून गेल्याने येथील अडतदारांची काही येणेबाकी त्यांच्याकडे अडकली आहे.

याला जबाबदार कोण? याची जबाबदारी बाजार समिती घेते काय? असे प्रश्न अडतदारांकडून उपस्थित केले जात आहेत. हे जरी खरे असले तरी, काही व्यापाºयांनी अडतदारांना गंडवले म्हणून तालुक्यातल्या शेतकºयांना डमी व्यापारी उभा करून अडतदारांनी कायम फसवणे योग्य आहे काय? बाजार समितीने अडतदारांची बैठक घेऊन वारंवार यासाठी सूचना दिल्या आहेत. पण अडतदार एवढे गब्बर आहेत की, ते बाजार समितीच्या पदाधिकाºयांचे म्हणणे ऐकतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे अडतदारांवर कुणाचाच अंंकुश राहिलेला नाही. याचा फटका येथील उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे.

अडतदार मालामाल : शेतकरी कंगाल
सरकारने अडतमुक्त शेतकरी निर्णय घेतल्याचा शेतकºयांना फायदा झालेला नाही. व्यापाºयांकडून ६ टक्के अडत घेणे, दर पाडल्याने कुचकामी ठरले आहे. बाजार समितीत गेल्या वर्षात ६ लाख १६ हजार २१९ क्रेट भगवा डाळिंबाला किमान १० रुपये ते कमाल ७० रुपये असा सरासरी ४० रुपये दर मिळाला; तर गणेश वाणाची ७९६३ क्रेट विक्री झाली. त्याला फक्त ५ रुपये ते २५ रुपये दर मिळाला. यातून शेतकºयांच्या हाती काही आले नसताना ४९ कोटी २९ लाख ७५ हजार २०० रुपयांची डाळिंबे खरेदीतून केवळ अडतीपोटी अडतदारांना २ कोटी ९५ लाख ७८ हजार ५१२ रुपये मिळाले आहेत.

बाजार समितीत शेतकºयांनी डाळिंबे आणल्यानंतर प्रत्येक क्रेटमध्ये हमाली साडेचार रुपये, प्रतवारी करणे साडेचार रुपये आणि वजन (तोलाई) करणे एक रुपया असे एकूण १० रुपये अडतदारांना घेता येतात. शेतकºयांकडून जीएसटीच्या नावाखाली पावतीवर कसलीही नोंद न करता प्रत्येक किलोला एक रुपया घेतला जात आहे. २०१८ या वर्षात इथे ६ लाख १६ हजार २१९ क्रेट भगवा, तर ७ हजार ९६३ क्रेट गणेश डाळिंबाची विक्री झाली आहे. एका क्रेटमध्ये २० किलो डाळिंबे असतात. म्हणजे १ कोटी २४ लाख ८३ हजार ६४० रुपये फक्त जीएसटीच्या नावाखाली घेतले गेले.
 

अडतदारांना वारंवार सूचना देत आहोत. शेतकºयांकडून जादा पैशाची आकारणी केलेल्या अडतदारांना दुप्पट दंड आकारून ते पैसे शेतकºयांना दिले आहेत.
- भाऊसाहेब गायकवाड, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती


डाळिंबाच्या सौद्यात अडतदाराने त्याच्या अडतीत अजिबात खरेदी करू नये, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.
- बी. डी. मोहिते, सहायक निबंधक, आटपाडी.

 

Web Title:  Pomegranate Growers Openly Cheating: Atpapadi Status - Pomegranate GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली