सकारात्मक दृष्टिकोन आनंदी जीवनाची गुरुकिल्ली : असिरा चिरमुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:24 PM2018-05-07T23:24:55+5:302018-05-07T23:24:55+5:30

वाई : ‘धकाधकीच्या जीवनात मनुष्य सुख शोधण्यासाठी धडपडत असतो, प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवतो; परंतु त्यासाठी तो नेहमी दुसऱ्याशी स्पर्धा करताना दिसतो, दुसऱ्याच्या यशामध्ये स्वत:चे सुख शोधल्यास यश तुम्हाला

 Positive Attitude Key to Happy Life: Asira Chirmule | सकारात्मक दृष्टिकोन आनंदी जीवनाची गुरुकिल्ली : असिरा चिरमुले

सकारात्मक दृष्टिकोन आनंदी जीवनाची गुरुकिल्ली : असिरा चिरमुले

googlenewsNext
ठळक मुद्देवाई येथे लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या आयोजित वसंत व्याख्यानमालेत प्रतिपादन

वाई : ‘धकाधकीच्या जीवनात मनुष्य सुख शोधण्यासाठी धडपडत असतो, प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवतो; परंतु त्यासाठी तो नेहमी दुसऱ्याशी स्पर्धा करताना दिसतो, दुसऱ्याच्या यशामध्ये स्वत:चे सुख शोधल्यास यश तुम्हाला शोधत येते, माणसाने जर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवल्यास जीवन आंनदी व सुखी होते. सकारात्मक दृष्टिकोन हा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे,’ असे प्रतिपादन क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ असिरा चिरमुले यांनी केले.

लोकमान्य टिळक स्मारक संस्थेने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विश्वकोशाचे अभ्यागत संपादक डॉ. सुरेश देशपांडे हे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद अभ्यंगकर, उपाध्यक्ष प्रा. सदाशिव फडणीस, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत रांजणे, कार्यवाहक वसंतराव बोपर्डीकर, सहकार्यवाहक अनिल जोशी, विश्वस्त सुनील शिंदे, अ‍ॅड. शांतिलाल ओसवाल, अजित खामकर, मधनकुमार साळवेकर, विशाल कानडे यांची उपस्थिती होती.
चिरमुले म्हणाल्या, सध्याचा मानव चंद्रावर जाऊन पोहोचला तरीही दुसºयाची निंदा-नालस्ती करण्याचे थांबलेला नाही. दुसºयाला पाण्यात पाहण्याने शिखराला गवसणी घालणारा परमोच्च आंनद मिळतो. दुसºयाला दु:खाच्या खाईत लोटून मिळविलेला आनंद हा जास्त काळ टिकणारा नसतो.

असिरा चिरमुले यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत मनुष्य जीवनात आनंद शोधण्यासाठी किती धडपडत असतो, हे अनेक उदाहरणे देऊन संवाद साधला. कार्यक्रमाचे लक्ष्मीकांत रांजणे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा प्रा.आनंद घोरपडे यांनी परिचय करून दिला. डॉ. रुपाली अभ्यंगकर यांनी आभार मानले.

तरच यश मिळते...
दुसºयाचा दुस्वा:स करणे सोडून द्या, जीवनात मिळालेल्या संधीच सोनं करा, समाजकार्यात स्वत:ला नि:स्वार्थीपणे झोकून दिल्यास खरा आनंद प्राप्त होतो. दुसºयाला दु:खाच्या खाईत लोटून मिळविलेला आनंद हा जास्त काळ टिकणारा नसतो. तुमचे कर्मच दु:खाला निमंत्रण देत असते. मिळणाºया फळाची आशा न बाळगता कार्य केल्यास यश निश्चितच मिळते व तो आनंद पराकोटीचा असतो.

Web Title:  Positive Attitude Key to Happy Life: Asira Chirmule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.