सांगलीला कोरोनाचा धोका कायम ; कोरोना रुग्ण संख्या पोहचली ३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 11:27 AM2020-04-28T11:27:16+5:302020-04-28T13:44:06+5:30
.मात्र नागरीकानी लॉक डाऊन च्या नियमाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार यांनी केले आहे
कामेरी - उमेश जाधव
कामेरी ता वाळवा येथील कोरोना पॉजीटीव्ह रुग्णा च्या संपर्कातील 17 लोकांच्या स्वॅबचे नमुने रविवारी तपासणी साठी मिरज येथे पाठविले होते .त्याचे अहवाल सोमवारी रात्री उशीरा प्राप्त झाले त्यापैकी 16 निगेटिव्ह तर 1 प्रलंबित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ साकेत पाटील यांनी दिली, मात्र, आता हा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने, कोरोनामुक्त होणाऱ्या सांगली जिल्ह्याला कोरानोना हुलकावणी दिल्याने आता सांगलीवरील कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. कामेरीमध्ये आजीबाईंचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानेच सांगली जिल्ह्यातील काही गावांवर आता बारीक लक्ष ठेवून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
- कामेरीतील रुग्णाच्या घरचे12 व जवळच्या संपर्का तिल कामेरी(3) येडेनिपाणी(1) बावची(1) अशा 17 लोकांना शनिवारी इस्लामपूर येथे संस्था अलगिकरन कक्षात ठेवले आहे.रविवारी त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणी साठी मिरज येथे पाठवले होते, कामेरी येथील 1 प्रलंबित रिपोर्ट आज दुपारी प्राप्त तो कोरोना पॉजीटीव्ह आहे . पहिल्या रुग्णा च्या घरातील 94 वर्षीय आजी चा रिपोर्ट पॉजीटीव्ह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ साकेत पाटील यांची माहिती कामेरीत रुग्ण संख्या झाली 2 कंटेन्मेंट एरीयात भीतीचे वातावरण आहे.
सोमवारी त्यांचे रिपोर्ट येण्यासाठी विलंब लागल्याने कामेरी,येडेनिपाणी, बावची गावात भीतीचे वातावरण होते मात्र 16 रिपोर्ट निगेटिव्ह आले .कामेरी तील रुग्णा च्या जवळच्या संपर्कातील 1 चा रिपोर्ट अद्याप प्रलंबित होता
- कामेरी येथील 1 प्रलंबित रिपोर्ट आज दुपारी प्राप्त तो कोरोना पॉजीटीव्ह आहे . पहिल्या रुग्णा च्या घरातील 94 वर्षीय आजी चा रिपोर्ट पॉजीटीव्ह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ साकेत पाटील यांची माहिती कामेरीत रुग्ण संख्या झाली 2 कंटेन्मेंट एरीयात भीतीचे वातावरण आहे.
- 16 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने चिंता कमी झाली आहे .मात्र नागरीकानी लॉक डाऊन च्या नियमाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार यांनी केले आहे
- दरम्यान कासेगाव (9)इस्लामपूर (2)व रेठरे धरण (1)असे वाळवा तालुक्यातील इतर 12 व कामेरी 16 एकूण 28 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत व 1 प्रलंबित आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ साकेत पाटील यांनी दिली त्यामुळे वाळवा तालुक्याला दिलासा मिळाला आहे.