धरणांमधील विसर्गात वाढ होण्याची शक्यता : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 02:17 PM2021-07-30T14:17:06+5:302021-07-30T14:19:41+5:30
Flood Sangli Collcator : आर्यर्विन पुल सांगली येथील पाणी पातळी 40 ते 42 फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावातील ग्रामस्थ/शेतकरी यांनी सतर्क रहावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
सांगली : आर्यर्विन पुल सांगली येथील पाणी पातळी 40 ते 42 फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावातील ग्रामस्थ/शेतकरी यांनी सतर्क रहावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
सांगली येथील आयर्विन पुलाचा पातळी आज दुपारी 2 वा. 39 फुट असून ती ओसरत आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करुन धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीव विसर्गामुळे कृष्णा नदीच्या सध्याच्या पाणी पातळीत 1 ते 2 फुटांची वाढ होऊ शकते.
सध्यस्थितीत कोयना धरण 86 टक्के भरले असून 48 हजार 931 क्युसेस विसर्ग होत आहे. धोम धरण 79 टक्के भरले असून 3 हजार 594 क्युसेस विसर्ग सुरु आहे. कण्हेर धरण 79 टक्के भरले असून 4 हजार 94 क्युसेस विसर्ग सुरु आहे. उरमोडी धरण 75 टक्के भरले असून 2 हजार 919 क्युसेस विसर्ग सुरु आहे.
त्यामुळे सध्याच्या पाणी पातळीत त्यामुळे आर्यर्विन पुल सांगली येथील पाणी पातळी 40 ते 42 फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावातील ग्रामस्थ/शेतकरी यांनी सतर्क रहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 0233-2301820, 2309525 या संपर्क साधावा.