जिल्ह्यात पोस्ट कोविड रुग्ण वाऱ्यावर, शासकीय पाऊल बेफिकिरीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:21 AM2020-12-25T04:21:46+5:302020-12-25T04:21:46+5:30
सांगली : राज्यात एकीकडे काेरोनाच्या नव्या विषाणूचा शिरकाव होत असताना, सांगली जिल्ह्यात प्रशासकीय पावले बेफिकिरीच्या वाटेवर पडत ...
सांगली : राज्यात एकीकडे काेरोनाच्या नव्या विषाणूचा शिरकाव होत असताना, सांगली जिल्ह्यात प्रशासकीय पावले बेफिकिरीच्या वाटेवर पडत आहेत. पोस्ट कोविड सेंटर्स असूनही त्यावर कोणाचाही वॉच नाही. याठिकाणी केवळ तपासणीची औपचारिकता पार पाडली जाते.
पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. डायबेटीस, हायपरटेन्शन, स्कीन रॅश, थकवा, खोकला अशा अनेक समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर वॉच ठेवणे, पोस्ट काेविड रुग्णांचा सॅम्पल सर्व्हे करणे, या गोष्टी गरजेच्या आहेत. कोविडमधून बरे झालेल्या काही रुग्णांनी ‘लोकमत’ला सांगितले की, रुग्ण घरी परतल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेचा कधीच कॉल येत नाही. तपासणी तर लांबची गोष्ट आहे. त्यामुळे आम्हालाच आमची काळजी घ्यावी लागते. रुग्ण बरा झाल्यानंतर त्यावर सातत्याने लक्ष ठेवण्याची यंत्रणा शहरी व ग्रामीण भागात कार्यरत नाही.
चौकट
काय काळजी घेतली जाते
आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना सातव्या - दहाव्या दिवशी रुग्णालयातून असिम्टोमॅटिक असल्याने घरी पाठवले जाते. त्यांची पुन्हा पूर्वीप्रमाणे टेस्ट निगेटिव्ह येईपर्यंत थांबवले जात नाही. कोरोनातून बरे झाल्यानंतरही काही महिने त्या रुग्णाच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून त्याच्या समस्यांची नोंद वैद्यकीय यंत्रणेने घेतली पाहिजे.
काय काळजी घेतली जाते
कोट
संपर्क साधला जातो!
पोस्ट कोविड सेंटर मिरजेला आहे. त्याठिकाणी रुग्णांना ठेवले जाते. रुग्ण बरा होऊन घरी परतल्यानंतर संबंधित आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स व अन्य कर्मचाऱ्यांचे पथक रुग्णांची सतत चौकशी करीत असते. त्यांच्या लक्षणांची नोंदही घेतली जाते. योग्य पद्धतीने यंत्रणा कार्यान्वित आहे.
- संजय साळुंखे,
जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली
यांनी घ्यावी काळजी...
n आयसीयूमध्ये उपचार घेतलेले कोविड रुग्ण
n उपचार घेताना ऑक्सिजन द्यावा लागलेले रुग्ण
n कोरोनातून बरे झालेले ज्येष्ठ नागरिक