कुंडल योजनेची पाणीपट्टी दरवाढ स्थगित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:30 AM2021-08-12T04:30:41+5:302021-08-12T04:30:41+5:30
पलूस : कुंडल प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वाढवलेली पाणीपट्टी स्थगित करावी, त्याचा फिल्टरेशन प्लांट त्वरित चालू करावा, अन्यथा पलूसमधील सर्व ...
पलूस : कुंडल प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वाढवलेली पाणीपट्टी स्थगित करावी, त्याचा फिल्टरेशन प्लांट त्वरित चालू करावा, अन्यथा पलूसमधील सर्व नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांना पलूसचे नगरसेवक नीलेश विठ्ठलराव येसुगडे, कपिल गायकवाड यांनी दिले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सभापती जगन्नाथ बंडू माळी, नागेश येसुगडे, पाणीपुरवठा अधिकारी उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले की, दरवाढ अन्यायकारक असून, त्याला स्थगिती मिळवून देऊ. कुंडल प्राधिकरण योजनेच्या कामकाजाचा आढावा लवकरच घेऊन पाणीपुरवठ्यामध्ये अजून सुधारणा करण्यात येईल. कुंडल प्रादेशिक योजना कालबाह्य झाली आहे, याकडे गांभीर्याने पाहावे. उर्वरित गावांना न्याय द्यावा, तसेच येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतचा विषयही लवकर सोडवावा.
100821\169-img-20210809-wa0033.jpg
कोरे फोटो