साेनवडे परिसरात संक्रांतीची लाेटकी बनविण्यात कुंभार बांधव व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:31 AM2021-01-08T05:31:49+5:302021-01-08T05:31:49+5:30
दरवर्षी १४ जानेवारीला संक्रांत सण साजरा केला जातो. या सणासुदीला घरी छोटी-छोटी मडकी घरोघरी पुजली जातात. त्यासाठी कुंभार समाजातील ...
दरवर्षी १४ जानेवारीला संक्रांत सण साजरा केला जातो. या सणासुदीला घरी छोटी-छोटी मडकी घरोघरी पुजली जातात. त्यासाठी कुंभार समाजातील लहानथोर, बायका मुलांसह या कामात व्यस्त आहेत. लहान मुले ही चाकावरती चिखलाच्या गोळ्यापासून छोटी-मोठी मडकी तयार करण्याची कला आपल्या वडीलधारी माणसाकडून शिकून घेतात. पूर्वी चिखलाचे चाक तयार करून त्याच चाकावर मातीला आकार देऊन मडकी करीत असत.; पण कालांतराने बदल करून आता इलेक्ट्रिक चाक मोटरच्या साहाय्याने फिरविले जाते व त्यावर मडकी तयार केली जातात. रात्रंदिवस हे काम सुरू आहे.
सध्या हे चित्र दुर्मीळ होत चालले आहे. वाढलेली महागाई, कुंभार कामासाठी माती मिळत नसल्याने अडचणी येतात. असे सोनवडे येथील दादू चंद्रु कुंभार सांगत होते. फोटो : ०७ वारणावती १
ओळ : साेनवडे (ता. शिराळा) येथील कुंभार कुटुंबीय फिरत्या चाकावर मातीला आकार देण्यात व्यस्त आहे.