परदेशी बँकेतून कर्जाचे आमिष, ९२ लाखांचा गंडा; सांगलीतील दोघांसह आठजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 12:00 PM2022-01-14T12:00:45+5:302022-01-14T12:01:31+5:30

दुबईतील बँकेकडून कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी अहमदाबाद येथील दिनेश देसाई, प्रवीण शहा यांच्या भेटीला नेले. देसाई व शहा यांनी दुबईतील रॅकिया इन्वेस्ट्मेंट ऑथॉरिटीमार्फत २१ कोटी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Poultry trader in Miraj cheated of Rs 92 lakh on the pretext of getting a loan of Rs 21 crore from a foreign bank | परदेशी बँकेतून कर्जाचे आमिष, ९२ लाखांचा गंडा; सांगलीतील दोघांसह आठजणांवर गुन्हा

परदेशी बँकेतून कर्जाचे आमिष, ९२ लाखांचा गंडा; सांगलीतील दोघांसह आठजणांवर गुन्हा

googlenewsNext

मिरज : परदेशी बँकेकडून २१ कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने मिरजेतील पोल्ट्री व्यावसायिकाची ९२ लाखांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगलीतील दोघांसह आठजणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत डाॅ. दत्तात्रय हणमंत दुबे (रा. लोंढे काॅलनी, मिरज) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

योगेश निशिकांत जांभळे, प्रमोद आप्पाजी देशपांडे (रा. विश्रामबाग सांगली), दिनेश देसाई, प्रवीण कुर्डुवार, भारतभूषण परांजपे, प्रवीणचंद्र मणीलाल शहा (सर्व रा. अहमदाबाद), डाॅ. अलशरीफ व महंमद सरावत (रा. दोघे दुबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मिरजेतील डाॅ. दत्तात्रय दुबे यांचा सोलापूर येथे पोल्ट्रीफार्म व डीएचके ऑग्रो फूडस या नावाने व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसाय विस्तारासाठी कर्ज मिळविण्यासाठी सांगलीतील योगेश जांभळे व प्रमोद देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी दुबईतील बँकेकडून कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी अहमदाबाद येथील दिनेश देसाई, प्रवीण शहा यांच्या भेटीला नेले. देसाई व शहा यांनी दुबईतील रॅकिया इन्वेस्ट्मेंट ऑथॉरिटीमार्फत २१ कोटी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

डाॅ. दुबे यांनी स्थानिक बँकेकडून कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून रिझर्व्ह बँकेकडे नोंद करून कर्जाचा प्रस्ताव दुबईतील बँकेचा कायदेविषयक सल्लागार डाॅ. अलशरीफ व महंमद सरावत नामक मध्यस्थांकडे पाठविण्यात आला.

डाॅ. अलशरीफ याने मुद्रांक शुल्क व प्रक्रिया शुल्क म्हणून एक कोटी २५ लाख रुपये डाॅ. दुबे यांना भरायला सांगितले. डाॅ. अलशरीफ याने सांगितलेल्या बँक खात्यावर डाॅ. दुबे यांनी वेळोवेळी ७८ लाख जमा केले. देसाई, शहा व त्यांच्या साथीदारांनी कमिशन म्हणून १४ लाख रुपये घेतले. अलशरीफ याने दुबईतील बँकेकडून २१ कोटी रुपये जमा केल्याची ट्रान्स्फर स्लीप पाठविली. मात्र, ही रक्कम जमा झाली नसल्याने दुबे यांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना दुबई येथील मध्यस्थांनी आणखी रक्कम भरायला सांगितली.

कर्ज देण्यास टाळाटाळ

कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू झाल्याने त्यांनी जांभळे, देशपांडे, देसाई, कुर्डुवार, परांजपे, शहा, डाॅ. अलशरीफ, महंमद सरावत या आठजणांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे. कर्जाच्या आमिषाने ९२ लाखांच्या फसवणुकीच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

Web Title: Poultry trader in Miraj cheated of Rs 92 lakh on the pretext of getting a loan of Rs 21 crore from a foreign bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.