जयंतरावांची ताकद अबाधित, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 05:31 PM2019-05-31T17:31:24+5:302019-05-31T17:32:36+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी आघाडी केल्यानंतरच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आ. पाटील यांची ताकद आपला विजय निश्चित करेल, असे शेट्टी यांना वाटत असतानाच पराभवाचा धक्का बसला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आ. पाटील यांची ताकद अबाधित असल्याचे दिसून आले, मात्र शेट्टींना मानणाऱ्या पूर्व भागातील तीन गावात माने यांनी मताधिक्य घेतले.

The power of Jayantrao is unbroken, but ... | जयंतरावांची ताकद अबाधित, पण...

जयंतरावांची ताकद अबाधित, पण...

Next
ठळक मुद्देजयंतरावांची ताकद अबाधित, पण...बालेकिल्ल्यात विरोधकांनी दिले धक्के

युनूस शेख 

इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी आघाडी केल्यानंतरच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आ. पाटील यांची ताकद आपला विजय निश्चित करेल, असे शेट्टी यांना वाटत असतानाच पराभवाचा धक्का बसला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आ. पाटील यांची ताकद अबाधित असल्याचे दिसून आले, मात्र शेट्टींना मानणाऱ्या पूर्व भागातील तीन गावात माने यांनी मताधिक्य घेतले.

गेल्या दोन अडीच वर्षांपासून जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात विरोधकांनी धक्के दिले आहेत. इस्लामूपर नगरपालिकेतील सत्तांतर, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवत विरोधकांनी राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत चुरस अनुभवास आली. कॉँग्रेस-राष्ट्रवादी  आघाडीची सोबत घेतल्याने गेल्या दोन निवडणुकीत त्यांना मदत करणारे राष्ट्रवादी वगळता सर्व पक्ष विरोधात गेले, तर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविलेल्या माने यांच्याविरोधात स्वाभिमानीसह राष्ट्रवादीची ताकद उभी ठाकली.

इस्लामपूर हे मतदारसंघातील सर्वात मोठे मतदारसंख्येचे शहर. येथे आ. पाटील यांची वर्चस्व असतानाही शेट्टींना केवळ २२१७ मतांचे अधिक्य मिळाले. गेल्यावेळेपेक्षा केवळ ४१ जादा मतांची भर पडली. त्यापाठोपाठ आष्टा शहरातही शेट्टींना केवळ ७६२ मताधिक्य मिळाले. तेथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे प्राबल्य आहे.
रेठरेहरणाक्ष परिसरात राष्ट्रवादीसह शेट्टींना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा वर्ग आहे. केवळ ७ बुथ असणाºया या गावात शेट्टींनी १७०९ इतके मताधिक्य घेतले.

बोरगावात कॉँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांचा गट शेट्टींविरोधात उघडपणे गेला. मात्र तरीही येथे शेट्टींना १००१ मते जादा मिळाली. साखराळेत ९१० जादा मते शेट्टींना मिळाली. वाळव्यात धैर्यशील माने यांना केवळ ३९९ मते जादा मिळाली. बावचीत शेट्टी १४८१ मतांनी पुढे राहिले. बागणीत ५०५, तर अवघे १० बुध असणाऱ्यां दुधगावात शेट्टींनी २१४५ मतांची आघाडी घेतली. शिगावात केवळ १८०, तर समडोळीत १५४५ जादा मते शेट्टी यांना मिळाली. कोरेगावात ३५४ चे अधिक्य मिळाले.

मतदारसंघाच्या पूर्व भागातील कवठेपिरान (१७५८), कसबे डिग्रज (८९७) आणि तुंग (२०८) अशी आघाडी धैर्यशील माने यांनी घेतली. मतदारसंघातील मोठ्या १५ गावांपैकी, इस्लामपूर, रेठरेहरणाक्ष, बोरगाव, साखराळे, बावची, आष्टा, बागणी, दुधगाव, कोरेगाव, शिगाव, समडोळी या ११ गावांतून शेट्टी यांना १२ हजार ८०९ मतांचे अधिक्य मिळाले, तर कवठेपिरान, वाळवा, कसबे डिग्रज, तुंगमधून माने यांना ३ हजार ६२ मते जादा मिळाली. गेल्या तुलनेत शेट्टींच्या मताधिक्यात घट झाली.

Web Title: The power of Jayantrao is unbroken, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.