सदाभाऊंमागे निशिकांत दादांची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:22 PM2017-10-02T13:22:35+5:302017-10-02T13:25:45+5:30

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून वेगळी चूल मांडली असून, या संघटनेला इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ताकद दिल्याचे दिसत आहे.

The power of Nishikant's grandfather on Sadbhau | सदाभाऊंमागे निशिकांत दादांची ताकद

सदाभाऊंमागे निशिकांत दादांची ताकद

Next
ठळक मुद्देइचलकरंजीच्या सदाभाऊ खोत यांच्या मेळाव्यावर विरोधकांची टीकामेळाव्यास वाळवा, शिराळा तालुक्यातील ऊस उत्पादक फारसे नाहीत. संघटनेला इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांची ताकद

अशोक पाटील

इस्लामपूर , दि. २ : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून वेगळी चूल मांडली असून, या संघटनेला इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ताकद दिल्याचे दिसत आहे.


सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या ताकदीवरच संघटनेची स्थापना केली आहे. कारण या संघटनेच्या पाठीशी इस्लामपूरचे नगराध्यक्ष, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील तसेच आष्ट्याचे वैभव शिंदे यांनीच ताकद लावल्याचे दिसत आहे.

संघटना मजबूत करण्यासाठी निशिकांत पाटील प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष देत आहेत. सदाभाऊंच्या प्रत्येक कार्यक्रमात ते व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात. त्यामुळे रयत क्रांती संघटना भाजपपुरस्कृत आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.


त्यातच सदाभाऊ खोत यांनी शनिवारी इचलकरंजी येथे झालेल्या मेळाव्यात आपण उसाचा दर ठरवू, असे सांगितले होते. या मेळाव्यास वाळवा व शिराळा तालुक्यातील ऊस उत्पादक फारसे दिसले नाहीत.


सदाभाऊंनी एफआरपीवर ३०० रुपये जादा घेणारच, अशी घोषणा यावेळी केली. त्यावर शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, सध्या उसाच्या नऊ टक्के उताºयाला २५५० रुपये एफआरपी आहे. त्यावर ३०० रुपये अधिक म्हणजे एकूण दर २८५० रुपये होतो.

जर ११ ते १२ च्या दरम्यान उतारा असेल, तर हा दर ३४५० रुपये जाईल. त्यावर ६५० रुपये तोडणी व वाहतूक वजा करता हा दर २८५० रुपयांवर येणार आहे. त्यामुळे सदाभाऊंची मागणी सरकारच्याच बाजूने असल्याचे दिसते. कर्नाटकातील कारखाने जाग्यावर ३००० रुपये देत असतील, तर आपल्या भागातील कारखान्यांनी किमान पहिला हप्ता ३५०० रुपये देणे गरजेचे आहे.

घोडेस्वार कितीही पट्टीचा असला तरी, एकाचवेळी दोन घोड्यांवर बसू शकत नाही. एक तर शेतकरी चळवळीत रहावे किंवा सत्तेत सामील व्हावे. गेल्यावर्षी मुख्यमंत्री आणि साखरसम्राटांना खूष करण्यासाठी उसाच्या दराच्या ८० टक्के एफआरपी दिली तरी चालेल, असे म्हणून शेतकºयांच्या अन्नात विष कालवणारे राजू शेट्टी आणि खोत शेतकरी चळवळ चालविण्याच्या योग्यतेचे नाहीत.
- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना.

राजू शेट्टी-सदभाऊ खोत हे शेतकºयांचे नेते नाहीत. भांडवलदारांना हाताशी धरत पैशाचा खेळ करुन इचलकरंजी येथील मेळाव्यास शेतकरी गोळा होतील, हा त्यांचा भ्रम होता. तो शेतकºयांनीच खोटा ठरवला आहे.
- बी. जी. पाटील, अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना.

सदाभाऊ खोत मंत्रीपद टिकविण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शेतकरी पाठीशी असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. दसरा मेळाव्याला वाळवा-शिराळा तालुक्यातील शेतकरी फिरकले नाहीत. यावरूनच शेतकºयांचा खोत यांच्यावर विश्वास नसल्याचे स्पष्ट होते.
- सयाजी मोरे, कार्यकारिणी सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Web Title: The power of Nishikant's grandfather on Sadbhau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.