कुंडलवाडी परिसरात विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:16+5:302021-04-15T04:25:16+5:30
तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे शेतीचा व गावातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे शेतीचा व गावातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.
कुंडलवाडी हे गाव कुरळप येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या कार्यक्षेत्रात येत असून येथूनच वीजपुरवठा देखभाल दुरुस्तीबाबत निर्णय घेतला जात असतो. शिवाय हे गाव वारणा नदीपासून जवळच असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत मोटारी बसवलेल्या आहेत, तसेच गावातील ग्राहकांना भगीरथ योजनेने विद्युत पुरवठा केला जात आहे. पण गेले आठ दिवस झाले गावातील व शेतातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या उष्णतेने तोंड चांगलेच वर काढले आहे. अशा स्थितीत विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज लोकांकडून व्यक्त होत आहे.