जतला रस्त्याच्या मध्येच विजेचा खांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:50+5:302021-09-23T04:30:50+5:30

येथे सांगली रस्त्यावरील आयटीआय ते ईदगाह मैदान या रस्त्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराने रस्त्यातील खांब न हटविता, ...

A power pole in the middle of the road | जतला रस्त्याच्या मध्येच विजेचा खांब

जतला रस्त्याच्या मध्येच विजेचा खांब

Next

येथे सांगली रस्त्यावरील आयटीआय ते ईदगाह मैदान या रस्त्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराने रस्त्यातील खांब न हटविता, गटारी न करता काम सुरू केले आहे. या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचा प्रारंभ थाटामाटाने करण्यात आला होता. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते व जत तालुका राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, नगरसेवक स्वप्निल शिंदे, नगरसेविका बाळाबाई मळगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत तो करण्यात आला होता. ठेकेदाराने खडीकरण व डांबरीकरण सुरू केले आहे. रस्त्याच्या बाजूला गटार न करताच काम सुरू केले आहे, शिवाय रस्त्याच्या मधोमध असलेला विद्युत खांब न काढताच, काम पूर्ण करण्याची घाईगडबड सुरू केली आहे. रस्त्यावर चढउतार ठेवले आहेत. या संपूर्ण कामाची खातेनिहाय चौकशी करावी, तसेच विद्युत खांब काढल्याशिवाय काम सुरू ठेवल्यास ते बंद पाडण्याचा इशारा परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.

220921\img-20210922-wa0021.jpg

वीज मंडळाच्या ठेकेदाराचा अल्लडपणा रस्त्याच्या मध्येच डांब रोवला

चारचाकी वाहनांना अडथळा

Web Title: A power pole in the middle of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.