मंदिरास घालत होती प्रदक्षिणा, अंधाराचा गैरफायदा घेत पुजाऱ्याने केला मनोरुग्ण महिलेचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 01:39 PM2022-08-26T13:39:25+5:302022-08-26T13:47:08+5:30

एका व्हिडिओद्वारे हा प्रकार समोर आला असून याबाबत नागरिकांतून संताप

Pradakshina was going around the temple, molestation of a mentally ill woman by a priest in Sangli district | मंदिरास घालत होती प्रदक्षिणा, अंधाराचा गैरफायदा घेत पुजाऱ्याने केला मनोरुग्ण महिलेचा विनयभंग

मंदिरास घालत होती प्रदक्षिणा, अंधाराचा गैरफायदा घेत पुजाऱ्याने केला मनोरुग्ण महिलेचा विनयभंग

Next

उमदी : उमदी ता. जत येथील एका मंदिरात पूजेसाठी आलेल्या मनोरुग्ण महिलेशी पुजाऱ्यानेच अश्लील चाळे करत विनयभंग केला. एका व्हिडिओद्वारे हा प्रकार समोर आला आहे. याबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत असून पुजाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कर्नाटकातील एक महिलेची मानसिक आवस्था बिघडलेली होती. करणीबाधा असल्याच्या संशयातून तिच्या कुटुंबीयांनी तिला एका स्थानिक मांत्रिकाकडे नेले. यावेळी मांत्रिकाने महिलेला जत येथील देवस्थानच्या ठिकाणी पाच दिवस राहून पूजा करावी असा सल्ला दिला होता. त्याच्या सांगण्यावरून महिलेच्या कुटुंबीयांनी तिला उमदीतील देवस्थानच्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आणून सोडले होते.

या दरम्यान पहाटेच्या पूजेवेळी ती महिला मंदिरास प्रदक्षिणा घालत असताना अंधाराचा व तिच्या वेडसरपणाचा गैरफायदा घेत मंदिरातील एका पुजाऱ्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने याचा मोबाईलवर व्हिडिओ तयार केला. आता हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकण्यात आला आहे. यामुळे संबंधित पुजाऱ्याच्या वर्तनाबाबत नागरिकांतून संताप भावना व्यक्त होत आहे. या पुजाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

हा अतिशय निंदनीय प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे मंदिराच्या पावित्र्यास धक्का पोहोचला आहे. संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी. या मंदिरामध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. मंदिरात कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसून अंतर्गत गटबाजीमुळे देवस्थानचा विकास खुंटला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - वर्षा शिंदे, सरपंच, उमदी

Web Title: Pradakshina was going around the temple, molestation of a mentally ill woman by a priest in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.