असंगठीत कामगारांना पेन्शन देण्यासाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:54 PM2019-05-30T13:54:13+5:302019-05-30T13:55:54+5:30
सांगली : विकास आयुक्त (हातमाग) नवी दिल्ली यांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली असून ही योजना असंगठीत ...
सांगली : विकास आयुक्त (हातमाग) नवी दिल्ली यांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली असून ही योजना असंगठीत कामगारांना पेन्शन देण्याकरीता सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत इतर कामगारांसह हातमाग कामगारांनाही या योजनेत समाविष्ठ करण्यात आले आहे. अशी माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, सोलापूर यांनी दिली.
या योजनेत सहभागी होणाऱ्या विणकरांना वय वर्षे 60 नंतर मासीक 3 हजार रूपये इतकी दरमहा पेन्शन मिळेल. योजनेत सहभागी होण्यासाठी 18 ते 40 वर्षापर्यंतचे हातमाग कामगार पात्र असतील. या हातमाग कामगाराचे मासीक वेतन 15 हजार रूपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
या योजनेत भाग घेण्यासाठी हातमाग कामगारांनी आपल्या परिसरातील कॉमन सर्वीस सेंटर येथे नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणीकामी हातमाग कामगारांना त्यांचे आधार कार्ड, बचत व जनधन बँक खात्याबाबत व मोबाईल नंबर याबाबत माहिती आवश्यक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी वयाप्रमाणे 55 रूपये ते 200 रूपये प्रतिमाह वय वर्षे 60 पर्यंत नियमित सहभाग रक्कम भरावी लागणार आहे.