विशाल पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट, कृतज्ञता व्यक्त करीत केला सत्कार; म्हणाले..
By अशोक डोंबाळे | Published: June 14, 2024 05:15 PM2024-06-14T17:15:31+5:302024-06-14T17:16:07+5:30
सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळविला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी बंडखोरी केली. खासदार विशाल ...
सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळविला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी बंडखोरी केली. खासदार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. विशाल पाटील यांनी आज, शुक्रवारी लोणावळा (जि.पुणे) येथे ‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत, त्यांचा फेटा बांधून आदर सत्कार केला, शिवाय माझ्यासाठी त्यांनी जे केलं, ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांनी आपला पाठिंबा काँग्रेसला जाहीर केला असला, तरी वंचितने त्यांना निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांचे आभार व्यक्त केले. विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपचे उमेदवार माजी खासदार संजय पाटील यांचा पराभव केला. तिरंगी लढतीत संजय पाटील सहज जिंकतील, अशी चर्चा होती. मात्र, विशाल पाटील यांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिला. यावेळी नेत्या अंजलीताई आंबेडकर, राज्य उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे उपस्थित होते.