प्रकाश शेंडगे यांचा राष्ट्रवादीला रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:22 PM2019-02-26T23:22:55+5:302019-02-26T23:22:55+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे सादर केला आहे. याबाबतचे निवेदन व राजीनामापत्र त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Prakash Shendge's nationalist Ram Rama | प्रकाश शेंडगे यांचा राष्ट्रवादीला रामराम

प्रकाश शेंडगे यांचा राष्ट्रवादीला रामराम

Next

जत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे सादर केला आहे. याबाबतचे निवेदन व राजीनामापत्र त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

राजीनामापत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत होतो. पक्षाने लोकसेवा करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर एसबीसी, भटक्या-विमुक्त जाती-जमाती, ओबीसी या मागास प्रवर्गाच्या जातींवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसी, भटक्या-विमुक्त जाती-जमाती व धनगर समाजाचे आरक्षण धोक्यात आलेले आहे. त्याच्या संरक्षणासाठी आणि बचावासाठी माझ्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. कोणत्याही पक्षाच्या चौकटीत राहून मला या मागास समूहाला न्याय देणे अशक्य होत आहे.

२५ फेब्रुवारी २०१९ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे या मागास समूहाच्या महामोर्चातील विविध संघटनांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व माझ्यावर सोपविले आहे. त्यामुळे मी पक्ष सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा देत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार व अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मला पक्षामध्ये सन्मानाचे पद देऊन काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असेही त्यांनी या राजीनामापत्रात म्हटले आहे.

माजी आमदार प्रकाश शेंडगे राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहून काम करणार, यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांच्या निकटवर्तियांनी मात्र, आता ते राष्ट्रवादीत राहणार नाहीत. लवकरच अन्य पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Prakash Shendge's nationalist Ram Rama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.