बावची उपसरपंचपदी प्रमोद माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:27 AM2021-03-10T04:27:49+5:302021-03-10T04:27:49+5:30
बावची ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असून एकूण १७ सदस्यांपैकी १० सदस्य राष्ट्रवादीचे आहेत तर सात सदस्य रयत विकास आघाडीचे ...
बावची ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असून एकूण १७ सदस्यांपैकी १० सदस्य राष्ट्रवादीचे आहेत तर सात सदस्य रयत विकास आघाडीचे आहेत.
शीतल अनुसे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी सरपंच वैभव रकटे यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
राष्ट्रवादीचे लोकनियुक्त सरपंच वैभव रकटे हे आहेत. एक ग्रामपंचायत सदस्य या निवडीवेळी अनुपस्थित होते. एकूण १७ मतांपैकी सहा मते विरोध उमेदवारांन मिळाली तर अकरा मते हे प्रमोद माने यांच्या पारड्यात पडली. त्यामुळे त्यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी विकास उरुणकर यांनी काम पाहिले.
प्रमोद माने म्हणाले, जिल्हा परिषद शाळेसाठी सर्वप्रकारच्या सुविधा, सोयी ग्रामपंचायत व लोकसहभागातून देऊ. शिक्षण व विकासकामांना प्राधान्य देणार असून सर्वांना विश्वासात घेऊन बावची गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहू.
यावेळी सरपंच वैभव रकटे,
गावचे ज्येष्ठ नेते विजयराव यादव, माजी सरपंच अनिल शिंगारे, पाणीपुरवठाचे अध्यक्ष सतीश पाटील, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अनुसे, विनायक अनुसे, प्रवीण गजरे, शीतल अनुसे, सारिका पिसाळ सुजाता यादव, अशा रकटे, सविता टोपकर, रूपाली जाधव आदी उपस्थित होते.