भिलवडीत विद्यार्थ्यामुळे शेतकºयास वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:24 PM2017-10-08T12:24:34+5:302017-10-08T12:26:11+5:30

भिलवडी (ता. पलूस) येथे नदीत बुडणाºया अधिक निकम या शेतकºयास विलींग्डन महाविद्यालयतील तुषार काळेबाग या विद्यार्थ्याने वाचविले. तुषारच्या या धाडसाबद्दल महाविद्यालय व्यवस्थापनाने त्याचा सत्कार केला. तुषार मूळचा भिलवडीचा आहे.

Pran read the farmer due to a proficient student | भिलवडीत विद्यार्थ्यामुळे शेतकºयास वाचले प्राण

भिलवडीत विद्यार्थ्यामुळे शेतकºयास वाचले प्राण

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीत सत्कार शौर्य पदकासाठी शिफारस

सांगली,8 : भिलवडी (ता. पलूस) येथे नदीत बुडणाºया अधिक निकम या शेतकºयास विलींग्डन महाविद्यालयतील तुषार काळेबाग या विद्यार्थ्याने वाचविले. तुषारच्या या धाडसाबद्दल महाविद्यालय व्यवस्थापनाने त्याचा सत्कार केला. तुषार मूळचा भिलवडीचा आहे.

त्याच्याच गावातील अधिक निकम हे बैल धुण्यासाठी नदीत गेले होते. बैलाला पाण्यात उतरुन धूत असताना त्याच्या पायातील कासरा निकम यांच्या पायात अडकला. बैलाने जोरात हिसडा दिल्याने निकम पाण्यात ओढले गेले. पाण्याला प्रचंड वेग होता. त्यामुळे निकम पाण्याच्या प्रवाहाराबरोबर वाहत जाऊ लागले.

तुषारने हा प्रकार पाहिला. त्याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन वाहत निघालेल्या निकम यांना वाचविले. त्यांना सुरक्षित नदी काठावर आणले. त्याच्या या धाडसाचे ग्रामस्थांनी कौतूक केले. महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पंडित यांनी तुषारचा सत्कार केला. शासनामार्फत देण्यात येणाºया शौर्य पदकासाठी त्याची शिफारस करण्यात आली आहे.

Web Title: Pran read the farmer due to a proficient student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.