जयंत चषक राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये प्रणाली वडार हिचा विजयी चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:32 AM2021-02-25T04:32:39+5:302021-02-25T04:32:39+5:30

ओळी : इस्लामपूर येथे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमधील विजेते स्पर्धक व असोसिएशनचे पदाधिकारी. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील राजारामबापू ...

Pranali Vadar's winning four in Jayant Cup state level badminton tournament | जयंत चषक राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये प्रणाली वडार हिचा विजयी चौकार

जयंत चषक राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये प्रणाली वडार हिचा विजयी चौकार

Next

ओळी : इस्लामपूर येथे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमधील विजेते स्पर्धक व असोसिएशनचे पदाधिकारी.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील राजारामबापू पाटील बॅडमिंटन अकॅडमीच्या प्रणाली वडार हिने १५ व १७ वर्षाखालील मुलींच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच दुहेरीत जुईली घोरपडे व यामिनी सूर्यवंशी यांच्या साथीत यश संपादन केले. राजारामबापू पाटील इनडोअर स्टेडियम, राजारामनगर इस्लामपूर येथे ही स्पर्धा पार पडली.

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षा माणिक परांजपे व वाळवा तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील, डॉ. शेखर परांजपे यांच्याहस्ते प्रणाली हिला बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच वाळवा पंचायत समिती शाखा अभियंता महादेव सूर्यवंशी यांच्याकडून प्रोत्साहनपर दोन हजार रुपये दिले. त्यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी सचिन भिलारे, प्रकाश वडार, अमोल पवार, अभिजित परम, धनाजी माने, सतीश सूर्यवंशी, प्रभाकर मस्कर, संतोष पाटील, विजय सावंत, अभिजित चिकुर्डेकर, मनोज गांधी, डॉ. जितेंद्र लादे, विकास पाटील, अभिषेक जाधव हजर होते. प्रा. नितीन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पंच म्हणून पारिजात नातू, राज जाधव, जयेश निंबाळकर यांनी काम पाहिले.

अन्य निकाल असे -१३ वर्षे मुले एकेरी- अनुक्रमे चैतन्य तरे, लौकिक ओसवाल, मुली एकेरी- श्रिया मोहिते, अपूर्वा खाडिलकर. १५ वर्षे मुले- एकेरी- चिन्मय धवलशेख, आर्यन खाडिलकर, १५ वर्षे मुले दुहेरी चिन्मय धवलशेख व साई नागेशकर, आदित्य आहुजा व प्रांजल माने. मुली एकेरी प्रणाली वडार, जुईली घोरपडे, मुली दुहेरी - प्रणाली वडार व जुईली घोरपडे, गार्गी फडके व कष्वी शहा, १७ वर्षे मुले एकेरी तेजस शिंदे, वेदांत शिंदे, मुली दुहेरी - सुदर्शन वडार व तेजस शिंदे, वेदांत शिंदे व जयेश निंबाळकर, मुली एकेरी- प्रणाली वडार, विभा पाटील, मुली दुहेरी प्रणाली वडार व यामिनी सूर्यवंशी, जुईली घोरपडे व सलोनी सारडा.

पुरुष खुला गट - दुहेरी निनाद अन्यापन्यावर व प्रथमेश कुलकर्णी, अक्षय मनवाडकर व दिग्विजय पवार, ३५ वर्षे पुरुष दुहेरी राकेश पेठारे व विकास करडे, सचिन भिलारे व सतीश सूर्यवंशी, ४५ वर्ष दुहेरी प्रथम अभिजित परमणे व संतोष पाटील, अनंत मनवाडकर व अतुल शिरोडकर.

Web Title: Pranali Vadar's winning four in Jayant Cup state level badminton tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.