सांगलीच्या दहा वर्षीय प्रांजलने सर केला अलंग मदन कुलंग रेंज, दहा वर्षांत ३५ किल्ले सर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 04:28 PM2023-12-28T16:28:32+5:302023-12-28T16:28:52+5:30

छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत गाठले ध्येय

Pranjal Bavachkar of Sangli made the fort trio Alang Madan Kulang | सांगलीच्या दहा वर्षीय प्रांजलने सर केला अलंग मदन कुलंग रेंज, दहा वर्षांत ३५ किल्ले सर

सांगलीच्या दहा वर्षीय प्रांजलने सर केला अलंग मदन कुलंग रेंज, दहा वर्षांत ३५ किल्ले सर

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करीत दहा वर्षीय सांगलीच्या प्रांजल बावचकरने अलंग-मदन-कुलंग हे दुर्ग त्रिकुट सर केले. सांगलीच्या १८ ट्रेकर्समध्ये प्रांजली ही सर्वांत लहान ट्रेकर होती.

सांगलीच्या सह्याद्री व्हेंचर्स या ट्रेकिंग ग्रुपने महाराष्ट्रातील सर्वांत अवघड समजल्या जाणाऱ्या अलंग-मदन-कुलंग हा रेंज ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या सह्याद्री डोंगररांगेतील कळसूबाई शिखराच्या जवळच असणारे हे जोडकिल्ले साहसी ट्रेकर्सना नेहमीच भुरळ घालत असतात. चढाईच्या दृष्टीने अतिशय अवघड समजला जाणारा हा ट्रेक सांगलीच्या प्रांजल सचिन बावचकर या अवघ्या दहा वर्षांच्या चिमुरडीने सर्व सुरक्षा साधनांचा वापर करत संयमाने आणि धाडसाने पूर्ण केला.

ट्रेकमध्ये एका ठिकाणी ६० फूट आणि एका ठिकाणी ४० फुटांचे रॅपलिंग (दोरीवरून चढून जाणे) करावे लागते. अनेक ठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. जिथून खाली पाहिले की काळजात धडकी भरते. गडावर गेले की भंडारदरा धरण, रतनगड, सांधण व्हॅली, हरिश्चंद्रगड, आजोबा डोंगर, कळसूबाई शिखर यांचे विहंगम दृश्य पाहण्यास मिळते. मागच्याच वर्षी प्रांजलने मोरिशीचा भैरवगड हा माळशेज घाटातील अवघड ट्रेक पूर्ण केला आहे.

दहा वर्षांत ३५ किल्ले सर

प्रांजलने आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास ३५ किल्ले सर केले आहेत. लहानपणापासूनच प्रांजलला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आहे. प्रांजल सध्या इयत्ता चौथीमध्ये आहे.

आव्हानात्मक ट्रेक

अलंग-मदन-कुलंग म्हणजे अलंगगड, मदनगड आणि कुलंगगड हे दुर्ग त्रिकुट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कळसूबाई डोंगररांगेमध्ये हे किल्ले समुद्रसपाटीपासून ४८०० फूट उंचीवर आहेत.

Web Title: Pranjal Bavachkar of Sangli made the fort trio Alang Madan Kulang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली