प्रसाद बाबर टोळी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:27+5:302021-07-14T04:32:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या प्रसाद बाबर टोळीला सांगली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या प्रसाद बाबर टोळीला सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतून नऊ महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी मंगळवारी दिले. या टोळीवर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.
टोळीप्रमुख प्रसाद ज्योतीराम बाबर (वय २२, रा. सावंत प्लाॅट), प्रमोद उर्फ लाल्या प्रकाश राबाडे (२६, माळी चित्रमंदिराजवळ), ताबीश इकबाल नदाफ (१९, रा. गारपीर चौक) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. या टोळीविरुद्ध २०१७ ते १९ या कालावधीत प्राणघातक हत्याराने मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा घालणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक गेडाम यांनी या टोळीला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून नऊ महिन्यांसाठी तडीपारीचे आदेश दिले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, अनिल तनपुरे, साहाय्यक फौजदार सिद्धाप्पा रुपनर, दीपक गट्टे, विलास मुंढे, ऋतुराज होळकर यांनी भाग घेतला.