प्रसादाच्या खिरीचे गहू ८५ रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 03:10 AM2020-08-22T03:10:49+5:302020-08-22T03:10:53+5:30
गव्हाचा दर ८५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. पॉलिश नसणारा गहू ७५ रुपयांनी विकला जात आहे.
सांगली : बाप्पांच्या आगमनाला जसे मोदक हवेतच; अगदी तसेच पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी गव्हाच्या खीरीचे महत्त्व असते. खपली गहू, गूळ, खोबरे आदी जिन्नस वापरून बनवली जाणारी ही पौष्टीक खीर तयार करणे यंदा चांगलेच महागडे झाले आहे. कारण खपली गव्हाचे दर चक्क ८० रुपये किलोवर पोहोचले आहेत. पॉलिश केलेल्या खपली गव्हाचा दर ८५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. पॉलिश नसणारा गहू ७५ रुपयांनी विकला जात आहे.
गेल्यावर्षी महापुरामुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत गव्हाचे पीक नष्ट झाले. बेळगाव जिल्'ालाही मोठा फटका बसला. त्यामुळे यंदा बाजारात जेमतेमच खपली गहू आला. लॉकडाऊनमध्ये वाहतूक मंदावल्यानेही परराज्यातून मोठी आवक झाली नाही. त्याचा परिणाम दरवाढीत झाला. गूळ, खोबरे आदींचे दरही वाढले आहेत.