जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:20 AM2021-01-10T04:20:11+5:302021-01-10T04:20:11+5:30

इस्लामपूर : सांगली जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी युवा नेते प्रतीक जयंत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सचिवपदी ...

Prateek Patil as the President of District Volleyball Association | जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील

जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील

googlenewsNext

इस्लामपूर : सांगली जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी युवा नेते प्रतीक जयंत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सचिवपदी प्रा. डॉ. संदीप शामराव पाटील यांची निवड झाली.

येथील गायत्री विश्रामगृहाच्या सभागृहात जिल्हा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्येष्ठ खेळाडू महंमदसाब मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रा. एम. एस. सूर्यवंशी, संस्थापक-सदस्य विलासराव जाधव, विश्वासराव पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डी प्रशिक्षक पोपट पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सुजाता नवले-कल्याणी यांची उपस्थिती होती.

कबड्डी प्रशिक्षक पोपट पाटील, प्राचार्य संजय ढोबळे-पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. क्रीडा अधिकारी जमीर अत्तार यांनी सूत्रसंचालन केले. मोहन पाटील यांनी आभार मानले.

यावेळी प्रकाश पाटील, अमोल पिसे, विश्वास साळुंखे, राजन पिसे, मामा इटकरकर, सुभाष सूर्यवंशी, उद्योजक रणजित पाटील, एम. जी. पाटील, मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, संतोष चिमण्णा, प्रा. सुभाष जानराव, इलाही रोटीवाले, जयकर पाटील उपस्थित होते.

चौकट

३६ वर्षांनी पुत्रास संधी

राजारामबापूंच्या निधनानंतर जयंत पाटील यांचे १९८४ मध्ये सार्वजनिक जीवनात आगमन झाले. त्यावेळी इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या माध्यमातून त्यांनी व्हॉलिबॉल खेळाला राजाश्रय दिला. त्यानंतर ३६ वर्षांनी त्यांचे पुत्र प्रतीक पाटील हे आता संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळे व्हॉलिबॉलचा खेळ आणि खेळाडूंना पुन्हा नवचैतन्य मिळणार आहे.

चौकट

विश्वास सार्थ करेन..!

माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्थ करून दाखवेन. युवा पिढीला या खेळातून पुढे आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणणे महत्त्वाचे आहे. व्हॉलिबॉल खेळाला इस्लामपूर शहराने मोठ्या आत्मियतेने जपले आहे. इस्लामपूर शहरासह जिल्ह्यात व्हॉलिबॉलचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरेल, यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.

फोटो-०९इस्लामपुर१

फोटो ओळ -

सांगली जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रतीक पाटील यांचा महंमदसाब मुल्ला यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Prateek Patil as the President of District Volleyball Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.