वाळवा तालुक्यातील आरोग्य केंद्रांना प्रतिक पाटील यांच्या भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:29 AM2021-05-20T04:29:18+5:302021-05-20T04:29:18+5:30
इस्लामपूर येथे वाळवा पंचायत समितीमधील बैठकीत प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शुभांगी पाटील, शशिकांत शिंदे, अजिंक्य कुंभार उपस्थित ...
इस्लामपूर येथे वाळवा पंचायत समितीमधील बैठकीत प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शुभांगी पाटील, शशिकांत शिंदे, अजिंक्य कुंभार उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यातील तसेच मिरज तालुक्यातील पश्चिम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना, उपकेंद्रांना युवा नेते प्रतीक पाटील यांनी भेटी दिल्या. तेथील लसीकरण व कोरोना तपासणी व्यवस्था तसेच त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पंचायत समितीमध्ये पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्याबरोबर चर्चा करून काही प्रश्न मार्गी लावले.
प्रतीक पाटील यांनी बोरगाव, वाळवा, बावची, बागणी, येडेमच्छिंद्र, कासेगाव, येलूर, कुरळप, कामेरी आदी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी दिल्या तसेच त्यांनी मिरज तालुक्यातील कवठेपिरान, सावळवाडी, माळवाडी, तुंग, दुधगाव तसेच कसबे व मौजे डिग्रजलाही भेट दिली. त्यांनी तेथील लसीकरण व्यवस्था व कोरोना तपासणी व्यवस्था तसेच अडी-अडचणी समजून घेतल्या. त्यांनी रोझावाडी, कसबे व मौजे डिग्रज येथील विलगीकरण कक्षासाठी बेडची व्यवस्था केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, रणजित पाटील, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते. प्रतीक पाटील यांनी वाळवा पंचायत समितीमध्ये सभापती शुभांगी पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्याशी तालुक्यातील आरोग्य सुविधांबाबत चर्चा केली.