शिराळ्यात बांधकाम सभापतिपदी प्रतिभा पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:18 AM2021-02-05T07:18:43+5:302021-02-05T07:18:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या बांधकाम, शिक्षण व नियोजन सभापतिपदी राष्ट्रवादीच्या प्रतिभा लालासाहेब पवार यांची बिनविरोध निवड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: शिराळा नगरपंचायतीच्या बांधकाम, शिक्षण व नियोजन सभापतिपदी राष्ट्रवादीच्या प्रतिभा लालासाहेब पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली.
नगराध्यक्षपदी बांधकाम सभापती सुनीता निकम यांची निवड झाल्याने हे पद रिक्त होते. शुक्रवारी तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. पवार यांचा एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. पवार यांच्याकडे महिला-बालकल्याण उपसभापतिपद आहे. यावेळी नगराध्यक्षा निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, अर्चना शेटे, सुनंदा सोनटक्के, विश्वप्रतापसिंह नाईक, कीर्तीकुमार पाटील, गौतम पोटे, संजय हिरवडेकर, सुजाता इंगवले, नेहा सूर्यवंशी उपस्थित होते.
चौकट-
इस्लामपूरला नणंद, तर शिराळ्यात भावजय बांधकाम सभापती
डिसेंबरमध्ये इस्लामपूर नगरपालिकेत सुनीता सपकाळ यांची बांधकाम सभापती म्हणून वर्णी लागली, तर शुक्रवारी शिराळा नगरपंचायतीत प्रतिभा पवार यांची बांधकाम सभापतिपदी निवड करण्यात आली. सपकाळ आणि पवार नणंद-भावजय आहेत. येथील ज्येष्ठ फोटोग्राफर लालासाहेब पवार यांच्या सुनीता सपकाळ भगिनी, तर प्रतिभा पवार पत्नी आहेत.