रमजान महिन्यात घरीच नमाज पठण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:24 AM2021-04-14T04:24:15+5:302021-04-14T04:24:15+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी कोरोना नियमांचे पालन करून घरीच नमाज ...
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी कोरोना नियमांचे पालन करून घरीच नमाज पठण करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी मंगळवारी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मुस्लिम समाजाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. रमजान महिना पवित्र मानला जातो. या महिन्याची सुरुवात १४ एप्रिलपासून होत आहे. सिंदकर म्हणाले, सध्या कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र झाली असून, संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वांनी पवित्र रमजान महिन्यात मशिदीत न जाता घरीच थांबावे व नमाज पठाण करावे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या संकटात पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. यावेळी ट्रस्टी प्रमुख नूरमहमंद जमादार, मौलवी मुफ्ती सादीक, जफार बारसकर, अमन पठाण यांच्यासह समाजातील प्रमुख उपस्थित होते.