गणेशोत्सवाची तयारी सुरु, सांगलीत ढोलताशा पथकांचे वाद्यपूजन; तरुणींचीही स्वतंत्र पथके 

By संतोष भिसे | Published: July 25, 2023 01:57 PM2023-07-25T13:57:21+5:302023-07-25T13:57:50+5:30

सध्या पावसामुळे सराव मंदावला आहे, पण पाऊस थांबताच तो पुन्हा वेग घेईल

Preparations for Ganeshotsav begin, musical performance by Dholtasha teams in Sangli | गणेशोत्सवाची तयारी सुरु, सांगलीत ढोलताशा पथकांचे वाद्यपूजन; तरुणींचीही स्वतंत्र पथके 

गणेशोत्सवाची तयारी सुरु, सांगलीत ढोलताशा पथकांचे वाद्यपूजन; तरुणींचीही स्वतंत्र पथके 

googlenewsNext

सांगली : गणेशोत्सव तोंडावर आला असल्याने वाद्यपथकांनीही तयारी सुरु केली आहे. सांगलीत तरुण भारत क्रीडांगणावर सोमवारी गावभागातील ओम रुद्र ढोलताशा आणि ध्वज पथकाच्या वाद्यांचे पूजन झाले. 

ज्येष्ठ ताशा वादक राजन घाणेकर, पुणे येथील समर्थ प्रतिष्ठानचे गणेश बोज्जी, शिवमुद्रा ढोलताशा पथकाचे संकेत गावखडकर आणि पूजा मल्लिगे-घोडके आदींच्या उपस्थितीत वाद्यपूजन झाले. यावेळी पथकातील १५० हून अधिक ढोलताशा वादक उपस्थित होते. त्यांनी वाद्यांचा एकच गजर करुन गणेशोत्सवाची सलामी दिली. यावेळी ओम रुद्र ढोल ताशा आणि ध्वज पथकाचे संस्थापक अध्यक्ष ओंकार चव्हाण, रणमर्द पथकाचे शीतल सदलगे, स्वराध्यक्ष पथकाचे पंकज पेडणेकर, रौद्रशंभो पथकाचे प्रशांत यादव व महामेरु पथकाचे अभिषेक पाटील, आनंदा चव्हाण आदी उपस्थित होते. 

गणेशोत्सवासाठी ढोलताशा पथकांनी सरावाला सुरुवात केली असून उपनगरांमध्ये दररोज सायंकाळी दणदणाट ऐकू येत आहे. सांगलीत कृष्णाकाठ, मोठी मैदाने, शाळांची क्रीडांगणे येथे सराव सुरु आहे. सध्या पावसामुळे सराव मंदावला आहे, पण पाऊस थांबताच तो पुन्हा वेग घेईल.

मुलींची स्वतंत्र पथके

शहरात अनेक ढोलताशा पथकांत तरुण व तरुणी एकत्र वादन करतात. शिवाय फक्त युवतींनीही स्वतंत्र पथके तयार केली आहेत. गणेशोत्सवामध्ये ही पथके महाराष्ट्रभरात फिरतात.

Web Title: Preparations for Ganeshotsav begin, musical performance by Dholtasha teams in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.