शिराळा शहरात लसीकरण केंद्र उभारणीची युद्धपातळीवर तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:38+5:302021-04-28T04:29:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शहरातील १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दि. १ मेपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शहरातील १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दि. १ मेपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात येत आहे. एकाच केंद्रावर लसीकरण शक्य नसल्याने आणखी केंद्र उभारणीच्या दृष्टीने युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.
त्या अनुषंगाने लसीकरणाचे प्रमाण अधिकाधिक वाढवण्याच्या हेतूने काय उपाययोजना राबवता येतील याची नगराध्यक्षा सुनीता निकम, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात पाहणी केली.
गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अजून नवीन दोन लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, नगराध्यक्षा सुनीता निकम यांच्यासह मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी व्यापारी असोसिएशन सभागृह, विश्वासराव नाईक महाविद्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत विचारविनिमय केला. लसीकरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याबाबत विश्वास दर्शवला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनीही लसीकरणासाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचारी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अर्चना गायकवाड, संजय मलमे, दीपक चिलवान, राजेंद्र निकम आदी उपस्थित होते.