लाखोंच्या उपस्थितीत येडोबाचा छबिना, गुलालाची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 09:05 PM2018-04-01T21:05:23+5:302018-04-01T21:05:23+5:30

यात्रेच्या दुस-या दिवशी रविवारी पार पडलेल्या येडोबा व जोगेश्वरी मातेच्या अभूतपूर्व लग्नसोहळ्यास लाखो भाविकांची उपस्थिती होती. 

In the presence of lakhs, Yadoba's dyeing, gully extract | लाखोंच्या उपस्थितीत येडोबाचा छबिना, गुलालाची उधळण

लाखोंच्या उपस्थितीत येडोबाचा छबिना, गुलालाची उधळण

googlenewsNext

कोयनानगर : ‘येडोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात येडोबा देवाचा छबिना मानाच्या सासनकाठ्या नाचवत व गुलाल खोब-याच्या उधळणीत काढण्यात आला. यात्रेच्या दुस-या दिवशी रविवारी पार पडलेल्या येडोबा व जोगेश्वरी मातेच्या अभूतपूर्व लग्नसोहळ्यास लाखो भाविकांची उपस्थिती होती. 

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणा-या येराड येथील येडोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस अलोट गर्दीत साजरा करण्यात आला. पहाटे पाच वाजता येडोबा व जोगेश्वरी मातेचा पारंपरिक रुढीपद्धतीने बाशिंग बांधून लग्न सोहळा पार पाडला. यावेळी प्रथमच भटजींनी मंत्र व मंगलाष्टका म्हटले. दंडस्थान व भाविकांचे नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारी बारा वाजता मानाच्या सासनकाठ्या वाजतगाजत मंदिर परिसरात दाखल झाल्या. 

लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल खोब-याची उधळण करीत वाद्याच्या तालावर सासनकाठ्या मंदिराला प्रदक्षिणा घालून नाईकबा मंदिराकडे गेल्या.  नगारा, ढोलताशाच्या गजरात सासनकाठ्या गुलाल खोबºयात न्हाऊन गेल्या होत्या. ‘येडोबाच्या नावान चांगभल’च्या गजराने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. यात्रा काळात मंदिराच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.

पाच दिवस चालणाºया या यात्रेत देवाला तेल चढवण्यापासून सासनकाठ्यांचे आगमन व देवाची बहीण जानुबाई देवीला आणण्यापर्यंतचे सर्व कार्यक्रम उत्साहाने पार पाडले जातात. सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस असून, लाखो भाविकांच्या उपस्थितीत छबिना व पारंपरिक विधी होणार आहे.

Web Title: In the presence of lakhs, Yadoba's dyeing, gully extract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.