शिराळा पश्चिम भागात मुसळधार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:11+5:302021-06-04T04:21:11+5:30
कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने ओढे, नाली तुडुंब भरून वाहिली. शेतात पाणी साचल्याने ...
कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने ओढे, नाली तुडुंब भरून वाहिली. शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामात धूळवाफ पद्धतीने केलेल्या पिकांच्या उगवणीस याचा फायदा होणार आहे.
शिराळा पश्चिम भागात सध्या धूळवाफ पद्धतीने सुरू असलेल्या पेरणीच्या कामाला वेग आला असून ५० टक्के पेक्षा जास्त भात पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. गुरुवारी दुपारी चार वाजल्यापासून मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने ओढे, नाली भरून वाहिली. मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचल्याने सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. पावसाने खरीप हंगामातील भात पिकाच्या उगवणीस फायदा होणार असून उघडिपीनंतर मका, भुईमूग, हायब्रीड आदी पिकांच्या पेरणीस सुरुवात होणार आहे.