मदनभाऊंच्या वारसांचे म्हणणे सादर

By admin | Published: December 10, 2015 12:08 AM2015-12-10T00:08:42+5:302015-12-10T00:53:30+5:30

वसंतदादा बँक गैरव्यवहार : एका वारसदारास जाहीर समन्स

Presenting the claims of Madanbhau heirs | मदनभाऊंच्या वारसांचे म्हणणे सादर

मदनभाऊंच्या वारसांचे म्हणणे सादर

Next

सांगली : वसंतदादा बँकेतील १७0 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी अध्यक्ष व संचालक मदन पाटील यांच्या तिन्ही वारसदारांनी बुधवारी आपल्या वकिलांमार्फत म्हणणे सादर केले आहे. सतीश बिरनाळे यांच्या एका वारसदाराचा पत्ता मिळाला नसल्याने त्यांच्यानावे जाहीर समन्स काढण्यात आले आहे. सर्वच माजी संचालक, कर्मचाऱ्यांचे म्हणणे सादर झाले असल्याने पुढील सुनावणीपासून युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील, सोनिया होळकर, मोनिका पाटील यांच्यावतीने वकिलांमार्फत म्हणणे सादर करण्यात आले. कर्मचारी पाचोरे यांच्या वारसदारांचेही म्हणणे सादर झाले आहे. वसंतदादा बँकेच्या १७० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. एक वारसदार वगळता यातील सर्वांनी म्हणणे सादर केले आहे. त्यामुळे युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. १३ रोजी कर्मचाऱ्यांच्यावतीने युक्तिवाद सुरु होईल, १८ रोजी मदनभाऊंचे वारसदार युक्तिवाद करणार आहेत.
वसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात १७० कोटी रुपयांच्या अनेक नियमबाह्य कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी त्यास स्थगिती दिली. विद्यमान सहकारमंत्र्यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन, स्थगिती उठविली.
त्यानुसार चौकशीस सुरुवात झाली होती. १७० कोटी रुपयांच्या नियमबाह्य कामांमध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. (प्रतिनिधी)


सहकार विभागाचा निकाल नाही...
दोघा अधिकाऱ्यांच्या याचिकेवर गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीनंतर सहकार विभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. लटकलेल्या सहकार विभागाच्या निर्णयामुळे संचालक, अधिकारी आणि बँकेशी संंबंधित अन्य घटकांची संभ्रमावस्था वाढली आहे.

Web Title: Presenting the claims of Madanbhau heirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.