आॅनड्युटी भटकंतीवाल्यांचा अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 11:27 PM2017-07-29T23:27:44+5:302017-07-29T23:29:33+5:30

सांगली : आॅनड्युटी भटकंती करणाºया महापालिकेतील ७४ कर्मचाºयांचा अहवाल शनिवारी कामगार अधिकाºयांनी आयुक्तांकडे सादर केला. कारवाईची शिफारस करण्यात आल्याने याबाबत आयुक्त काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Presenting the report of Indus Wanderers | आॅनड्युटी भटकंतीवाल्यांचा अहवाल सादर

आॅनड्युटी भटकंतीवाल्यांचा अहवाल सादर

Next
ठळक मुद्देकुणी बाहेर गेले होते, तर कुणी बाहेरगावी गेले होते. कर्मचारीही नागरिकांची कामे सोडून घरचीच कामे या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.अनेकांच्या मस्टरवर सह्या नव्हत्या.


महापालिका कामगार अधिकाºयांचे पत्र : कारवाईची शिफारस, आयुक्तांच्या कारवाईकडे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आॅनड्युटी भटकंती करणाºया महापालिकेतील ७४ कर्मचाºयांचा अहवाल शनिवारी कामगार अधिकाºयांनी आयुक्तांकडे सादर केला. कारवाईची शिफारस करण्यात आल्याने याबाबत आयुक्त काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अचानक तपासणीमुळे कामचुकार कर्मचारी पुरते अडचणीत सापडले आहेत.
महापालिकेच्या पाणीपुरवठा, डेÑेनेज विभागासह अनेक विभागात कर्मचारीच कामावर दिसत नाहीत. नागरिक कामासाठी महापालिका कार्यालयात आले तर, अनेकदा कर्मचारी जागेवरच नसतात. कायम कर्मचारी, किमान वेतन घेणारे कर्मचारीही नागरिकांची कामे सोडून घरचीच कामे करीत असताना आढळून आले आहेत.

याबाबत अनेकदा आयुक्तांकडे तक्रारी आल्या होत्या. महापालिकेतील बाराशेहून अधिक कर्मचाºयांना किमान वेतन लागू केले आहे. यामुळे महापालिकेवर वर्षाला ११ कोटींचा बोजा पडणार आहे. किमान वेतन लागू केल्यानंतर अद्याप कर्मचाºयांच्या कामात सुधारणा झालेली दिसून आलेली नाही. उलट कामातील निष्काळजीपणा दिसूृन येत आहे.

आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कामगार अधिकारी चंद्रकांत आडके यांनी पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागात जाऊन तपासणी केल्यानंतर अनेकांच्या मस्टरवर सह्या नव्हत्या. असे ७४ कर्मचारी आढळून आले. यात डेÑेनेज विभागातील १३ आणि पाणीपुरवठा विभागातील ६१ कर्मचारी कामावर गैरहजर असल्याचे आढळून आले.

कुणी बाहेर गेले होते, तर कुणी बाहेरगावी गेले होते. काही कर्मचाºयांनी मस्टरवर ३१ जुलैपर्यंतच्या सह्या अगोदरच केल्याचे दिसून आले. ही सर्व नावे कामागर अधिकाºयांनी नोंदविली आहेत. त्यांच्यावरील पुढील कारवाईसाठी अहवाल कामगार अधिकाºयांनी आयुक्तांकडे पाठवला आहे. आयुक्त या कर्मचाºयांची बिनपगारी करतील, नोटिसा बजावून सुनावणी घेतील किंवा त्यांच्या सर्व्हिस बुकला ठपका ठेवून नोंद करुन घेतील. यापैकी एक तरी कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापौरांकडूनही कारवाईची शिफारस
शनिवारी महापौर शिकलगार यांनी कामगार अधिकारी आडके यांना बोलावून कर्मचाºयांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केली. कारवाईचे समर्थन केले. आयुक्तांनी कारवाई करावी, अशी शिफारसही त्यांनी केली आहे. किमान वेतन लागू केल्यानंतर कर्मचारी काम करीत नसतील तर हयगय केली जाणार नाही, प्रसंगी पगार रोखू, असा इशारा कर वसुलीच्या आढावा बैठकीत पूर्वीच दिला आहे. ४ आॅगस्ट रोजी सर्व कर्मचाºयांची बैठक महापौर स्वत: घेणार आहेत. त्यावेळीही कर्मचाºयांच्या बेशिस्तपणाचा मुद्दा चर्चेला येण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Presenting the report of Indus Wanderers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.