‘पोलिसिंग’वर भर देऊन गुन्हेगारी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:58 PM2017-11-21T23:58:21+5:302017-11-21T23:59:27+5:30

Prevent crime by emphasizing 'police' | ‘पोलिसिंग’वर भर देऊन गुन्हेगारी रोखा

‘पोलिसिंग’वर भर देऊन गुन्हेगारी रोखा

Next


सांगली : शहरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय असून, पोलिसांनी बेसिक ‘पोलिसिंग’वर भर देऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे आदेश जिल्हाधिकारी विजय काळम यांनी दिले. पोलिस ठाण्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीला सौजन्याची वागणूक देऊन त्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी. केवळ कच्ची नोंद करुन घेऊ नका. अनिकेत कोथळेच्या प्रकरणावरुन आत्मपरीक्षण करुन पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही काळम यांनी केले.
घरफोड्यांसह अन्य गुन्ह्यांचा आढावा व त्यावर उपाययोजना करण्यासाठी काळम यांनी मंगळवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, डॉ. दीपाली काळे, सराफ असोसिएशनचे किशोर पंडित, व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा, विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत डोंबाळे, नगरसेविका अश्विनी कांबळे, शिवसेना महिला आघाडीच्या सुनीता मोरे, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे बापूसाहेब पाटील उपस्थित होते.
काळम-पाटील म्हणाले की, एखादी घटना घडली आणि तक्रार देण्यास व्यक्ती आल्यानंतर त्याची कच्ची नोंद घेतली जात असल्याच्या तक्रारी आहेत. पण कच्ची नोंद हे कायद्यात नाही. यापुढील काळात पोलिसांनी प्रत्येक तक्रारीची नोंद करावी; अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल. हातात काठी व डोक्यावर टोपी, शिस्तबद्धपणा दाखविला पाहिजे. ‘सीसीटीव्ही’ ही काळाजी गरज आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी जिल्हा नियोजन समितीमधून दिला जाईल. निधी कमी पडल्यास शासनस्तरावरुन मिळवून दिला जाईल. बिअर बार, हॉटेल याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसतील, तर त्यांना परवाने देऊ नका. कोथळे प्रकरणानंतर पोलिसांविषयी चर्चा वाईट आहे. पोलिसांबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी जनसंपर्क वाढवावा. जनताच मदतीसाठी येत असते, हे लक्षात घेऊन बेसिक पोलिसिंगवर भर द्यावा. एखाद्या प्रकरणावरून पोलिसांचे खच्चीकरण होणार नाही, जनताही ते करणार नाही, असे डोळ्यासमोर ठेवून पोलिसांनी भविष्यात काम केले पाहिजे.
बैठकीस उपस्थित नगरसेवक, व्यापारी व विद्यार्थी प्रतिनिधींची मते काळम यांनी जाणून घेतली. उपअधीक्षक धीरज पाटील यांनी पोलिसांनी केलेल्या कारवार्इंची माहिती दिली. सातत्याने नाकाबंदी केली जात आहे, असेही सांगितले.
कोठडीतील मृत्यू खपवून घेणार नाही
काळम म्हणाले, यापुढे कोठडी व तुरुंगातील संशयित आरोपींचे मृत्यू खपवून घेतले जाणार नाहीत. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधिकाºयांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. पोलिसांनी सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी लागणारा निधी दिला जाईल. पोलिस शांतता व सुव्यवस्थेबाबत प्रयत्नशील आहेत. पण अनिकेत कोथळे प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या चोºयांना आळा घालण्यासाठी गस्त पथक वाढविणे, नवीन पोलिस चौक्या स्थापन करणे, मुख्य बाजारपेठेत गस्त वाढविणे यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलिस प्रशासनाला समाजातील सर्व घटकांनी मदत करावी.

Web Title: Prevent crime by emphasizing 'police'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा