बेकायदा कर्नाटक एसटीला प्रतिबंध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:51+5:302021-02-12T04:24:51+5:30
वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी मिरज शहरात शास्त्री चौक व इतर ठिकाणी अधिकृत थांबा नसताना थांबणाऱ्या कर्नाटक एसटींचा ...
वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी मिरज शहरात शास्त्री चौक व इतर ठिकाणी अधिकृत थांबा नसताना थांबणाऱ्या कर्नाटक एसटींचा बेकायदेशीर थांबा बंद करावा. म्हैसाळपासून मिरजेपर्यंत जेवढे अपघात होतात, त्यास ८० टक्के कर्नाटक एसटीच कारणीभूत आहेत. परमिट नसलेल्या कर्नाटक राज्यच्या एसटी बसेस राज्यात येऊ देऊ नयेत. म्हणजे होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होईल. याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेतर्फे दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शास्त्री चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला.
शिवसेनेचे कामगार नेते डॉ. महेशकुमार कांबळे व मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी एसटीचे मिरज आगार व्यवस्थापक आप्पासाहेब खांडेकर यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी बबलू पठाण, फिरोज पटेल, दशरथ कोळी, मोजन पिरजादे, धनपाल लोखंडे, गफूर कोतवाल, शानुर मोमीन, रवी कांबळे, राजू पठाण, तुकाराम आवळे, परशु कोरवी, एजाज पटेल, मोहसीन पटेल उपस्थित होते.
फोटो-११मिरज१